king Cobra Attack Viral Video : जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा. या सापाच्या नजरेसमोरही जाणं म्हणजे मृत्यूच्या दारातच गेल्यासारखं असतं. हल्ली सापांसोबत खेळ करून रील बनवण्याचा फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तरुण मुलं सापांसोबत मस्ती करून व्हिडीओ व्हायरल करताना दिसत आहेत. पण काही जणांना सर्पदंश झाल्याने जीवाला मुकावंही लागलं आहे. साप समोर दिसल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण एका तरुणाने चक्क किंग कोब्रासोबत जीवघेणा खेळच सुरु केल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका रिंगणात किंग कोब्रासारख्या अत्यंत विषारी सापासोबत छेडछाड करण्याचा धक्कादायक प्रकार एका तरुणाने केला. सापाची शेपटी पकडण्याचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
किंग कोब्राचा हा थरारक व्हिडीओ @virtcamtravel नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये म्हटलंय, “किंग कोब्रा जगातील सर्वात विषारी साप आहे आणि हा तरुण या सापासोबत खेळ करताना जराही डगमगताना दिसत नाहीय.” हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “किंग कोब्रा जगातील सर्वात विषारी साप नाही पण तो जगातील विषारी सापांमध्ये सर्वात लांब साप आहे. वेस्टर्न टायपन हा जगातील सर्वात विषारी साप आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, “जो पर्यंत एखाद्याला दंश होत नाही, तोपर्यंत या तरुणांना सापांचा खेळ करायला आवडतं.”
नक्की वाचा – Viral : ‘पठाण झाला फ्लॉप’; ‘त्या’ चित्रपटगृहातील व्हायरल व्हिडीओमुळं सिनेविश्वात खळबळ
इथे पाहा व्हिडीओ
सापांज्या जवळ गेल्यावर ते माणसाच्या अंगावर धाऊन दंश करण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडीओतही एक तरुण किंग कोब्राच्या जवळ जाऊन त्याची शेपटी पकडताना दिसत आहे. त्या तरुणाने किंग कोब्राच्या शेपटीला हात लावताच तो साप त्याच्या अंगवार धावतो. त्यानंतर दोन-तीन वेळा फणा मारण्याचा प्रयत्न करतो. पिसाळलेला किंग कोब्रा त्या तरुणावर वारंवार फणा मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. जीवाला धोका निर्माण झालेला असतानाही तो तरुण सापापासून दूर राहण्याचा विचार करत नाही. तो त्याचा जीवघेणा स्टंट सुरुच ठेवतो. किंग कोब्राने मारलेल्या फण्याचा त्या तरुणाला स्पर्श न झाल्याने त्या तरुणाचा जीव थोडक्यात वाचतो. सापांपासून दूर राहून स्वत:च्या जीवाचं रक्षण करा, असं आवाहन वन विभागाकडून रानावनात भटकणाऱ्या माणसांना दिलं जातं. पण काही माणसं नियमांचं उल्लंघन करून आपाल जीव धोक्यात टाकताना दिसतात.