सिंह जंगलाचा राजा. त्याच्या नादी सहसा कुणी लागत नाही. मग सिंहाचे छावे जरी असले तरी त्याच्याशी पंगा घेण्याची कुणीही हिंमत दाखवत नाही. पण एका व्यक्तीने ती हिंमत दाखवलीय. त्याने थेट सिंहाच्या छाव्यांशी पंगा घेतलाय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून सिंहाच्या छाव्यांशी पंगा घेणं दिसतं तितकं सोपं नाही हेच लक्षात येत. हा व्हिडिओ सध्या जगभर व्हायरल होतोय. सिंहाच्य छाव्यांना पाहून तो त्यांना ओंजारत गोंजारत होता. पण त्याचं हे धाडस त्याच्या अंगाशी येतं. पुढं जे घडतं त्यामुळे तो ही घटना आयुष्यभर लक्षात राहील.
सिंहाचे छावे असले तरी त्यांना कमी समजू नये. शेवटी जंगालाच्या राजाची पिल्ले असतात ते. हेच सांगणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन सिंहाचे छावे कारवर बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी उभा असलेला एक माणूस आपल्या हातांनी त्यांना सतत ओंजारत गोंजारताना दिसतोय. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. पण सिंहाच्या छाव्यांपैकी एकाला त्याचं हे ओंजारणं गोंजारणं काही आवडलेलं दिसत नाही. यातील एक छावा चिडतो आणि गर्जना करू लागतो. खरं तर व्हिडीओ निरखून पाहिला तर लक्षात येईल. हा व्यक्ती त्यांना ओंजारत असताना दुसरा व्यक्ती मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करताना दिसतो. आपला व्हिडीओ काढत असल्याचं पाहून सुरूवातीला हा छावा चिडतो. नंतर बाजूला असलेला व्यक्ती सतत त्याच्या पाठीवरून हात फिरवतच राहतो. मग काय या छाव्याचा राग अनावर झाला आणि आपल्या पाठीवरून हात फिरवत असलेल्या व्यक्तीवरच हल्ला केला.
बरं हा छावा इतका भडकलेला पाहून तो माणूस काही ऐकायला मागत नाही. तो पुन्हा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण हा छावा तिथून पळून जातो. हे पाहून तो माणूस छाव्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा छावा काही या माणसाच्या हाताला लागत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो तरुण किती सहजतेने हल्ला केल्यानंतर स्वत:चा बचाव करतो.
आणखी वाचा : बुडत्या टायटॅनिक सारखं दिसणारं बाऊन्सी हाऊस पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ basit_ayan_3748 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर होताच तो झपाट्याने व्हायरल देखील होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “हा मूर्खपणा आहे,” असं एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलं आहे. “सुंदर पण खूप धोकादायक,” दुसर्याने कमेंट दिली. “हे खूप धोकादायक आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करू नका” असं तिसऱ्या यूजरने लिहिलं आहे.