करावे तसे भरावे ही म्हणावे ही म्हण आपल्याला इयत्ता ४ थीमध्ये आपण शिकलेली आहे. अनेकदा आपण प्राणी किंवा माणसाचं वाईट चिंतायला अथवा करायला जातो आणि तसाच प्रकार पुन्हा आपल्यासोबत घडतो ज्याला आपण ज्याचं जसं कर्म तसं फळ असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट केल्यावर वाईटच होतं. याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस रस्त्यावरून जात असताना शेजारी उभा असलेल्या उंटासोबत असं काही करतो की त्याचं फळ दुसऱ्याच मिनिटाला मिळतं. हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे खरंय की, आपण जसं काम करतो त्याच पद्धतीचं फळ आपल्याला मिळत असतं. आता तुम्ही व्हायरल व्हिडीओ पाहाच. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून एक उंट शांत चालत जात होता. नेमकं त्याच वेळी त्याच्या शेजारून जाणाऱ्या एका माणसाने या उंटाची खोड काढली. हा व्यक्ती उंटाची शेपूट खेचण्याचा प्रयत्न करत होता. पण हा उंट इतका हूशार निघाला की याला माणसाला आपली शेपूट ओढून तर दिलीच नाही, पण त्याला चांगला धडा शिकवला.

आणखी वाचा : अन् बघता बघता कागदाप्रमाणे पूल वाहून गेला…हे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIRAL VIDEO

जसाच हा व्यक्ती उंटाची शेपूट ओढायला त्याला हात पुढे करतो तसंच हा उंट मोठ्या हुशारीने आपल्या एका पायाने त्याला अडवतो आणि त्याच पायाने त्याला धाडकन खाली पाडतो. या उंटाने थेट व्यक्तीच्या कमरेतच लाथ मारली. त्यानंतर तो ज्या पद्धतीने खाली पडतो ते पाहून असं वाटत आहे की पुढचा एक आठवडा तर उठू शकणार नाही. उंटाला त्रास देण्याचा नादात या व्यक्तीने स्वतःच्या कमरेतच लाथ मारून घेतली.

आणखी वाचा : Viral Video : बहिणीच्या लग्नात मुलीने असा धमाकेदार डान्स केला की, सर्व म्हणाले… “बिजली,बिजली!”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : थंडीत सकाळी उठायला आळस येतो म्हणून ही आयडिया वापरली, एकदा हा Viral Video पाहाच

ही जनावरे स्वतःहून माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. पण जेव्हा माणसाकडून त्यांना जर काही त्रास होत असेल तर ते अशा पद्धतीने व्यक्त होणं हे सहाजिकच आहे. हा मजेदार व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘कर्मा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून ५ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीने स्वतःच्याच लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय की बघणारे फक्त बघतच राहिले

लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहे. तसंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपली वेगवेगळी मत कमेंट्स सेक्शनमध्ये शेअर करत आहेत. काही युजर्सनी कमेंट करत लिहिलंय की, “कर्माचे फळ ऑन द स्पॉट”. तर दुसऱ्या आणखी एका युजरने लिहिलंय की, ” शिक्षा मिळायला थोडा सुद्धा उशीर झाला नाही”. काही युजर्सनी तर “शेवटी, लोक मुक्या प्राण्यांना चिडवून त्रास का देतात? असा सवाल केलाय. अनेकांनी जैसी करनी वैसी भरनी, या तरुणाला चांगलीच अद्दल घडली सारख्या तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेक युझर्सनी तर या तरुणाप्रती संताप व्यक्त केला आहे.