जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जाता आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याचा आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याच ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कुत्र्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कशी अद्दल घडते ते पाहा. एका व्यक्तीच्या कर्माची शिक्षा त्याला लगेच मिळाल्याने तो आता पुन्हा अशी चुक करण्यापूर्वी नक्कीच १०० वेळा विचार करेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला कुत्रा झोपलेला दिसत आहे. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक तरुण उभा आहे. काही लोकांना प्राण्यांना उगाच त्रास द्यायची सवय असते, त्याप्रमाणे हा तरुणही उगाच कुत्र्याची खोड काढायला जातो. तरुण कुत्र्याला विनाकारण लाथ मारायला गेला मात्र हुशार कुत्रा तिथून बाजूला झाला. मग काय तरुण स्वत:च तोंडावर आपटला. चुकीच्या कर्माची शिक्षा कधी कधी लवकर मिळते तर कधी उशीरा. या तरुणाला मात्र लगेच त्याच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा मिळाली.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळते की दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करू नका, नाहीतर तुमचंही वाईट होईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मेरे बॉयफ्रेंडके साथ गुलुगुलु करेगी तो”…एका बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणी भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @crazyclipsonlyया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, ‘कर्म नेहमीच येते.’ तर दुसरा म्हणाला, ‘त्याची हालचाल पाहून कुत्र्यालाच धक्का बसला.’ दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘पुढच्या वेळी तो अशी चूक करणार नाही.’