Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. दरम्यान, ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून चर्चेत आहे; कधी अपघातांमळे, तर कधी एक्स्प्रेसमधल्या सुविधांमुळे. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडीओ धक्कादायक आहे. कारण- धावत्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये चढताना एका व्यक्तीचा तोल जाऊन अपघात झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्लॅटफॉर्मवरून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुटली. त्यावेळी एका प्रवाशाने दरवाजे बंद असतानाही धावत्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा थोडक्यात जीव बचावला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आरपीएफ जवानाने वेळीच या व्यक्तीला रुळांवर पडता पडता वाचवलं, जवानानं स्वत:च्या जीवाची बाजी लावत त्या व्यक्तीला ट्रेनसोबत पळता पळता बाहेर खेचलं.
ज्याची भीती होती तेच घडलं…
पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वेस्थानकातील मंगळवारची ही घटना आहे. हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस हावडा रेल्वे स्टेशनस्थानकावरून रवाना झाली. त्यावेळी एक प्रवासी घाईघाईत रेल्वेच्या मागे धावत होता. उशीर झाल्यानं त्याची ट्रेन सुटली होती. त्या गडबडीत त्यानं धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि असं घडलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: फुकटे प्रवासी वाढले! अंधेरीनंतर आता भाईंदर स्टेशनवर टीसींची फौज; विनातिकीट प्रवास करताना सावधान…
या जवानाचंही सोशल मीडियावर कौतुक होतंय. हा व्हिडीओ @imurpartha या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, ही संपूर्ण चूक त्या व्यक्तीची आहे. त्यानं वेळेवर यायला हवं होतं. तर दुसऱ्या एका युजरनं, आरपीएफ जवानाच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक केलं आहे.