जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जाता आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याचा आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याच ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोराने केलेल्या चुकीच्या कर्माची शिक्षा त्याला लगेच मिळाल्याने तो आता पुन्हा अशी चुक करण्यापूर्वी नक्कीच १०० वेळा विचार करेल. चोरांना वाटतं आपण करत असलेली चलाखी कुणालाही कळत नाही, मात्र ते सगळ्यांना माहिती असते.
चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडीओ आत्तापर्यंत तुम्ही पाहिल्या असतील. यात चोर बाईकवरून येत रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांच्या हातातील पर्स किंवा मौल्यवान दागिने हिसकावून काही क्षणात पसार होतात, त्यामुळे अशाप्रकारे चोरी करणाऱ्या चोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. पण या घटनेत चोराला लगेच कायम लक्षात राहिल अशी शिक्षा मिळाली.
याला म्हणतात कर्माचे फळ!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेंगदाणा विक्रेता बाजारात विक्रिसाठी बसला आहे, यावेळी त्याच्याकडे शेंगदाणे विकत घेण्यासाठी एक व्यक्ती येतो. दुकानदार शेंगदाण्यांचे वजन करू लागताच ती व्यक्ती आपल्या धूर्त चेहरा दाखवते आणि विक्रेत्याच्या न कळत आपल्या एका हाताने शिंगदाण्याच्या शेंगा आपल्या खिशात लपवते. पण हा विक्रेताही कमी नाही, त्याने ही शेंगदाणे पॅक करत असताना त्या व्यक्तीचे लक्ष भटकवले आणि शेंगदाने वजना प्रमाणे दिलेच नाही. अर्धे शेंगदाणे पिशवीत तर अर्धे खाली पाडले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: बापरे! ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी भीषण दुर्घटना; काचेचा पूल अचानक फुटला अन् पर्यटक थेट ३० फूट खाली
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @naveenpandit621 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.