Man Vs Tiger : जंगल सफारी करताना कधी कोणता प्राणी शिकार करण्याचा प्रयत्न करेल, याचा नेम नाही. वाघ, सिंह, बिबट्यासारखे प्राणी माणसांवर हल्ला करण्याचा इराद्यातच असतात. पण काही जण वाघासारख्या थरकाप उडवणाऱ्या प्राण्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्नही करतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्यक्तीने वाघाशी मैत्री करून त्याला किस करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हीही चक्रावून गेल्याशिवाय राहणार नाहीत.

वाघाचा हा व्हिडीओ @tgulyaet नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक व्यक्ती वाघाला अनेकदा किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राण्यांमध्ये आणि माणासांमध्ये असलेलं बॉण्डिंग कसं असतं, हेच दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आतापर्यंत या व्हिडीओला ६८ मिलिनय व्यूज मिळाले आहेत.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video

नक्की वाचा – समुद्र किनाऱ्यावर आढळला सर्वात विषारी आणि मोठा साप, लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन

इथे पाहा व्हिडीओ

परंतु, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच काही लोकांनी संतापही व्यक्त केला आहे. अशा प्राण्यांपासून दूर राहणं नेहमीच योग्य असतं, असंही काही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एकाने प्रतिक्रिया देत म्हटलंय, अरे देवा! हे खूप सुंदर आहे, मला आवडलं. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या व्हिडीओला विरोध करत म्हटलं, हे खूप खतरनाक आहे. अन्य एकानेही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, अरे देवा, हे खूप धोकादायक आहे. वाघाने हल्ला करून माणसांची शिकार केल्याचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यामुळे अशा हिंस्र प्राण्यांपासून चार हात लांब राहण्यासाठी सूचना दिल्या जातात. पण काही माणसं या प्राण्यांसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात.

Story img Loader