लाल दिव्याच्या गाड्यांना सध्या बंदी आहे. मात्र मुंबईच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक लाल दिव्याची गाडी फिरत होती. विशेष म्हणजे दिनेश शेट्टी एका सजग मुंबईकराने ही लाल दिव्याची गाडी पाहून तिचा फोटो ट्विट केला. त्यांनी हे ट्विट मुंबई पोलिस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ‘व्हीआयपी कल्चर’ अजूनही अस्तित्त्वात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई पोलिसांनी या सगळ्याबाबतचा खुलासा केल्यानंतर हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिनेश यांनी केलेल्या ट्विटला मुंबई पोलिसांनी दुसऱ्या दिवशी उत्तर दिले. ते म्हणतात, लाल दिव्याच्या गाडीत बसलेले व्हीआयपी मॅक्स आणि टायसन नावाचे श्वान आहेत. एखाद्या ठिकाणी बॉम्ब असल्याचा संशय आल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी पोहचण्यासाठी मॅक्स आणि टायसनला लाल दिव्याच्या गाडीतून रवाना केले जाते. यानंतर दिनेश यांनी पोलिसांनी अशाप्रकारे त्वरीत उत्तर दिल्याद्दल त्यांचे आभार मानले.

केंद्र सरकारने व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी सरकारी वाहनांवरील लाल दिव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालणाऱ्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्यानुसार १ मे पासून गाड्यांवर लाल दिवा लावण्यास बंदी करण्यात आली होती. हा नियम राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्य न्यायाधीशांसाठीही लागू आहे.

मुंबई पोलीस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याची उदाहरणे यापूर्वीही पाहण्यात आली आहेत. सध्या मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन ३० लाखांहून अधिक जण फॉलो करतात. याबरोबरच या व्टिटर हँडलवरुन नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाते, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात.