Man Urinating Metro Viral Video: मेट्रो स्थानकावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी मेट्रो स्थानकावर नाचणाऱ्या लोकांचे तर कधी अश्लील कृत्य करणाऱ्या कपलचे व्हिडीओ अधिक प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसले. अशातच आता मेट्रो स्थानकावरील एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मेट्रो स्थानकावर उभा राहून लज्जास्पद कृत्य करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणाविरोधात तीव्र संपात व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जपानमधील या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण प्रवाशांची वर्दळ असलेल्या मेट्रो स्थानकावर उभा राहून लघवी करताना दिसत आहे. भारतात मेट्रोचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओंमध्ये विविध प्रकारचे लोक विचित्र गोष्टी करताना दिसतात. कधी कोणी तरी, कुठे तरी नाचतंय, कुठे कोण गाणी म्हणतंय, तर कुठे कोणी अश्लील कृत्य करतंय. मात्र, केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही असे विचित्र कृत्य घडत असतात.

सध्या जपानमधील एका मेट्रो स्थानकावरील समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावर उभा राहून मेट्रो ट्रॅकवर लघवी करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूने अनेक प्रवासी जात- येत आहेत; तर समोरच्या प्लॅटफॉर्मवरही बरेच लोक उभे आहेत. पण, तरीही हा तरुण बिनधास्तपणे लघवी करतोय. इतक्यात तिथे एक सुरक्षा कर्मचारी धावत येतो आणि त्या तरुणाला पकडून घेऊन जाताना दिसतो.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एक्सवर @aravind नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मी सर्व भारतीयांना सांगतो की हो, भारतात अस्वच्छता आहे, परंतु अस्वच्छता फक्त भारतातच होत नाही आणि इतर देशही काही स्वर्ग नाहीत. कारण सर्वच देशांमध्ये अस्वच्छता आहे, पण मीडियात तुम्हाला क्वचितच दाखवले जाते. जगभरात अस्वच्छता का आहे? एक जपानी माणूस मेट्रो स्थानकावर आरामात लघवी करत आहे.”

हेही वाचा – तुम्ही खात असलेले ब्रँडेड आईस्क्रीम एक्सपायर तर नाही ना? अमूलच्या नावाखाली कसा चाललाय ग्राहकांच्या जीवाशी खेळ? Video एकदा पाहाच

जीव गेला तरी चालेल, पण Video बनवणारचं! अपघातानंतर डोक्यातून वाहतय रक्त, पण मोबाइल काही सोडला नाही; यूट्यूबरचा धक्कादायक प्रताप

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले की…आणि आपण आपल्या सर्व भारतीयांना सांगितले जाते की, “जपान ही सर्वात आधुनिक सभ्यता बाळणारा देश आहे”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “जपान अतिशय सुरक्षित आणि सभ्य आहे, पण परिपूर्ण नाही”. अशाप्रकारे लोक कमेंट्स करत त्या तरुणाच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.