सोशल मीडियाचे जग आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. इथे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कधी अशा काही गोष्टी व्हायरल होत असतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सध्या असा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक श्रीमंत व्यक्ती अगदी छोटंस काम करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसून येते. यावरुन त्या व्यक्तीकडे किती संपत्ती असेल याचा अंदाज बांधला जात आहे. या श्रीमंत व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सही खूप कमेंट्स करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेलिकॉप्टरमधून कचरा टाकायला पोहोचला

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मोकळ्या जागेत कचऱ्याचा मोठा डब्बा दिसतोय. जिथे लोक घरातील कचरा टाकायला येतात. पुढच्याच क्षणी तिथे एक हेलिकॉप्टर येते आणि त्यात बसलेला एक व्यक्ती त्यात कचऱ्याची पिशवी टाकून पुन्हा निघून जातो. कचऱ्या टाकायला जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर केल्याची ही पहिलीच घटना असेल.

व्हिडीओत हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावरुन अनेकांनी त्या व्यक्तीच्या संपत्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ @raajcar नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये अनेकांनी हसण्याची इमोजी शेअर केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man used helicopder to throw garbage video goes viral sjr