भारतात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. जुगाडचे अनेक व्हिडीओ दर काही दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी कोण विटांपासून कूलर बनवतोय; तर कधी कोणी सायकलवर चालणारी वॉशिंग मशीन. पण, यावेळी व्हायरल होत असलेला व्हिडीओ जरा वेगळा आहे. या व्हिडीओत वॉशिंग मशीनचा असा अनोख्या पद्धतीने वापर केला आहे की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. या व्हिडीओत वॉशिंग मशीनमध्ये चक्क बटाटे टाकले आहे; जे कशासाठी टाकले ते आपण जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली बहुतेकांच्या घरी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. पण, फार कमी वेळा जास्त कपडे धुण्यासाठी म्हणून वॉशिंग मशीन वापरली जाते. या व्हिडीओत वॉशिंग मशीनचा केलेला वापर पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

वॉशिंग मशीनचा असा वापर तुम्ही कधी पाहिला आहे का?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कोणीतरी वॉशिंग मशीनमध्ये बटाटे टाकले आहेत, तसेच जेट स्प्रेद्वारे त्यात सातत्याने पाणी टाकले जात आहे. मशीनमध्ये बटाट्यांच्या बरोबरीने पाणी भरताच त्या व्यक्तीने वॉशिंग मशीन सुरू केली. मशीनमध्ये कपड्यांप्रमाणे बटाटे फिरू लागले आणि त्यामुळे बटाट्याची माती व साले आपोआप निघू लागली. आजपर्यंत तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर फक्त कपडे धुण्यासाठी केला असेल; पण या व्यक्तीने बटाटे सोलण्यासाठी ती वापरली.

हा व्हिडीओ @darbhanga07 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये ‘हे ​​कधीतरी करून पहा.’ आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला. ज्यावर एका युजरने लिहिले की, भाऊ या फॉर्म्युल्याचा शोध कोणी लावला? दुसऱ्या युजरने लिहिले की, हे वॉशिंग मशीन नाही; बटाटे सोलण्याचे मशीन आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man used washing machine to peel potatoes video going viral sjr
Show comments