Paragliding Viral Video : कार्यालयात काम करुन थकवा जाणवल्यावर सुट्टीच्या दिवशी घरात आराम करावसं वाटतं. पण सोफ्यावर ऐटीत बसून टीव्ही पाहायला अनेकांना आवडत असेल. घरात असल्यावर चहाचा कप हातात घेऊन टीव्ही पाहण्याचा आनंद काहीसा वेगळा असतो. पण एका पठ्ठयानं घरात नाही, घराच्या अंगणातही नाही, तर चक्क आकाशात भरारी घेत सोफ्यावर बसून टीव्ही पाहण्याचा आनंद लुटला आहे. तुम्हालाही हे वाचून आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल, पण हे सत्य आहे. पॅराग्लायडिंग करताना कारण एका माणसाने पॅरोशूटसोबत सोफा आणि टीव्ही आकाशात नेल्याचा थरारक कारनामा केला आहे. त्या व्यक्तीच्या भन्नाट पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरन नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बघता बघता त्याने सोफ्यावर बसून आकाशात घेतली भरारी, टीव्ही सुरु केला अन्…

पॅराग्लायडिंगचा हा व्हिडीओ @weirdterrifying नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडीओ २०२० मध्येच शेअर करण्यात आला होता. पण हा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ इंटरनेटवर इतका गाजला, जवळपास १ कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. एक माणूस त्याच्यासोबत सोफा आणि टीव्ही घेत पॅराग्लायडिंग करुन आकाशात भरारी घेताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोफा आणि टीव्ही त्या संपूर्ण सेटअपला बांधल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ती व्यक्ती सोफ्यावर ऐटीत बसून स्नॅक्स खात असताना टीव्ही पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हसन कावल असं पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो एका लाल सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
सोशल मीडियावर अशाच प्रकारचे थरारक व्हिडीओ दिवसेंदिवस व्हायरल होताना दिसत आहेत.

नक्की वाचा – ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच तृतीयपंथीयाने घातलाय धुमाकूळ, ‘बेशरम रंग’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, Video पाहिलात का?

इथे पाहा व्हिडीओ

रिल्स बनवून इंटरनेटवर प्रकाशझोतात येण्यासाठी काही माणसं विनाशकाले विपरीत बुद्धीचा वापर करतात. धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्नही काही माणसं करत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत आहे. उंच डोंगरावर जाऊन सेल्फी काढण्याच्या मोहापायी काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग किंवा इतर संबंधीत अधिकाऱ्यांकडून जीवाला धोका निर्माण होईल, अशा गोष्टी न करण्याचे आवाहन नागरिकांना केलं जातं. व्हिडीओ किंवा फोटो काढताना धोकादायक ठिकाणी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही नागरिकांना नेहमीच दिल्या जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man using couch to watch tv while doing paragliding in the sky people stunned after watching shocking viral video nss