Man vs Lion Shocking Video Viral : जंगलात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. काही प्राणी शाकाहारी असतात तर काही माणसांची शिकार करतात. वाघ, सिंह, बिबट्यासारख्या प्राण्यांपासून चार हात लांब राहिलेलच बरं..कारण हे हिंस्र प्राणी काही क्षणातच माणसाचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. पण एका माणसाने चक्क सिंहाजवळ जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. जंगलात असलेल्या सिंहाने त्या माणसाला पाहताच मोठी झेप घेतली आणि त्याच्या मानेला घट्ट पकडलं. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. सिंहासारखा प्राणी माणसासोबत असं काही करू शकतो, यावर अनेकांचा विश्वासच बसला नाहीय. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेला सिंहाचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@african_animal नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर सिंहाचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक माणूस सिंहाजवळ जातो आणि काही सेकंदातच सिंह मोठी झेप घेऊन त्या माणसाला खाली पाडतो. सिंह ज्या प्रकारे त्या माणसावर उडी मारतो, ते पाहून असं वाटतं की तो शिकारीच्या मूडमध्येच आहे. परंतु, त्या माणसाने सिंहाशी जीवलग मैत्री केलेली असते. त्यामुळे सिंहाजवळ जायला त्याला कसलीच भीती वाटत नाही. सिंह त्याच्या मित्राला पाहून उडी मारतो आमि प्रेमाने त्या माणसाला खाली पाडतो. दोघांमध्ये मैत्रीचे धागेदोरे घट्ट असल्याने सिंह त्या माणसावर हल्ला करत नाही.

नक्की वाचा – दुधात विष मिसळून नर्सने ७ नवजात बालकांचा केला खून, रुग्णालयातील धक्कादायक घटनेचा ‘असा’ झाला पर्दाफाश

इथे पाहा सिंहाचा थरारक व्हिडीओ

सिंहाचा हा सुंदर व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला सिंहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ९३ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं की, ही जगातील सर्वात मोठी मिठी आहे. अन्य एका यूजरने म्हटलं की, हे दृष्य किती सुंदर आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man vs lion heartwarming video viral on instagram people shocked after watching lions adorable behavior with humans wildlife videos nss