अंकिता देशकर

Man Vs Robot Table Tennis Video: लाइटहाऊस जर्नलिझमला इंटरनेटवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना आढळला. हा व्हिडीओ अनेकांच्या भुवया उंचावत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने थक्क करणारा हा व्हिडीओ कदाचित तुम्हीही आतापर्यंत पाहिला असेलच. यामध्ये एक रोबोट आणि माणूस यांच्यातील टेबल टेनिसचा खेळ दिसतो. यामध्ये रोबोट माणसाला हरवताना ज्या कमाल अविर्भावात आणि एकदम कूल अंदाजात शॉट खेळतो ते पाहून सर्वच थक्क होत आहेत. हा व्हिडीओ पाहायला कितीही रंजक वाटत असला तरी यातील एक बाब मात्र अनेकांकडून मिस झाली आहे. ती काय हे आता आपण जाणून घेऊया…

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Shocking video a big accident happened while opening the nut of the oxygen cylinder you will be surprised to see it
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय? ऑक्सिजन सिलेंडरचा भयंकर स्फोट; मात्र एका पाऊलानं तरुण कसा बचावला पाहाच

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Anjana ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर यूजर देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमचा तपास सुरू केली. कीफ्रेमने कोणतेही उपयुक्त परिणाम दिले नाहीत आणि म्हणून आम्ही गूगल कीवर्ड शोधण्यास सुरुवात केली. आम्ही ‘Robot plays table tennis with a human player’, असे कीवर्डस वापरून आमचा शोध सुरु ठेवला, पण या मुळे आम्हाला फार योग्य माहिती देऊ शकतील असे परिणाम मिळाले नाही. त्यामुळे आम्ही आमचा तपास युट्युब कडे वळवला आणि टेबल टेनिस चे व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली.

आम्ही फक्त ‘table tennis videos’ असे गूगल वर टाकल्यास आम्हाला दुसऱ्या पेज मध्ये असाच एक व्हिडिओ दिसला . या व्हिडीओचे शीर्षक होते, ‘The best table tennis shot of 2023’

हा व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडिओ सारखाच होता.

हा व्हिडिओ ‘Table Tennis Daily’ या चॅनेल वर अपलोड करण्यात आला होता याला 3.3 मिलिअन व्ह्यूज होते. हा व्हिडिओ तीन महिन्या आधी अपलोड करण्यात आला होता. आम्ही त्यानंतर किफ्रेम्सच्या मदतीने या मॅचचे तपशील सांगू शकेल असे व्हिडीओ शोधले. यात आम्हाला खालील व्हिडीओ आढळून आला.

या विडिओ मध्ये Český Stolní Tenis यांना क्रेडिट्स देण्यात आले होते. त्यानंतर आम्ही हे नाव शोधले. आम्हाला त्या नावाच्या फेसबुक प्रोफाइल वर हा व्हिडिओ सापडला.

आम्हाला या नावाच्या हॅन्डल वर इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ सापडला.

आम्ही रीलच्या कॅप्शनचे भाषांतर केल्यावर त्यात लिहिलेले आढळून आले की, झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया यांच्यातील पात्रता सामन्यातील एक अविश्वसनीय देवाणघेवाण! वांग यांग यांचाअविश्वसनीय विजय #ceskystolnitenis

निष्कर्ष: टेबल टेनिस गेममध्ये मानवी खेळाडूला मारणाऱ्या रोबोटचा व्हायरल व्हिडिओ CGI (कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी) वापरून बनवला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

Story img Loader