Viral Video: आपल्यातील अनेक जण व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे पसंत करतात. पण, सध्या अनेक सार्वजनिक उद्यानात ‘ओपन जिम’ ही सुविधा देखील नागरिकांसाठी उपलब्ध केलेली दिसून येते. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून मोकळ्या हवेत सहजगत्या व्यायाम करणे कोणालाही नाही आवडणार?… त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी या उद्यानात विनामूल्य व्यायाम करण्याची सोय नागरिकांसाठी ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोकळ्या हवेत व्यायाम करण्याचा एक जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे.
व्हायरल व्हिडीओत एक तरुण अनोख्या ट्रेडमिलवर कसरत करत आहे. आजूबाजूला हिरवेगार शेत आहे व मधोमध चिखलाने भरलेली एक जमीन आहे. चिखलाने भरलेल्या जमिनीच्या येथे एक लोखंडी रॉड सुद्धा आहे. तर तरुण त्या चिखलात अगदी ट्रेडमिलवर व्यायाम केला जातो अगदी हुबेहूब त्याप्रमाणे व्यायाम करताना दिसून आला आहे. तसेच चिखलामुळे तरुणाने एक पाऊल पुढे टाकताच त्याचा पाय आपोआप मागे सरकू लागतो आणि आपसूकच ट्रेडमिलवर व्यायाम करतोय असं दिसू लागतं. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वर्कआउट करताना तरुणाचे चेहऱ्यावरील हावभाव देखील मजेशीर आहेत. असं असले तरीही व्हिडीओचा शेवटही अगदी मजेशीर रित्या होतो. चिखलात व्यायाम करत असताना अचानक एक चिमुकला तिथे येतो आणि नळाला लावलेला एक पाईप हातात घेतो आणि चिखल असलेल्या जागेत पाणी पाईपाद्वारे टाकतो. त्यामुळे तरुणाचा पाय घसरून तो मजेशीर रित्या खाली पडत. यादरम्यान त्याला कोणतीही दुखापत झाली नाही असे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tonego25 या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी हे अनोखं ट्रेडमिल पाहून मजेशीर तर अनेक जण हास्यास्पद इमोजी पाठवताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच व्हिडीओला “होमली क्विक जिम” अशी कॅप्शन दिली आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून व्यक्तीच्या कल्पक्तेचं कौतुक होत आणि त्याने तयार केलेल्या या नैसर्गिक ट्रेडमिलची रचना पाहून नक्कीच प्रशंसा कराल. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.तसेच दररोज व्हायरल होणाऱ्या अनेक देसी जुगाडमध्ये हा सुद्धा व्हिडीओ जोडला गेला आहे असे म्हणायला हरकत नाही.