सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती जो स्विमिंग पूलच्या बाजूच्या एका वॉटर स्लाइडवर चढताना दिसत आहे. तो वॉटर स्लाइडवरून घसरत स्विमिंग पूलमध्ये जात असतो पण तेव्हाच त्याच्यासोबत असे काही प्रकार घडते की तो पाहून उपस्थित लोक जोरजोरात हसू लागतात. यावेळी त्या व्यक्तीची झालेली अवस्था पासून कोणालाही हसू आवरणे अवघड होईल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ असून स्विमिंग पूल लाईटिंगमुळे उजळून निघाला आहे. यावेळी लोक स्विमिंग पूलमध्ये मज्जामस्ती करताना दिसत आहेत. तर अनेकजण कोल्ड ड्रिंग्सचा आस्वाद घेत आहेत. या मज्जी मस्तीच्या माहोलमध्ये एक व्यक्ती वॉटर स्लाइटवर चढताना दिसतोय. तो स्लाइटवरून सरकत स्विमिंग पूलमध्ये जाणार तेवढ्यात त्याच्या वजनाने वॉटर स्लाईड तुटते आणि तो त्यात अडकून जोरात खाली कोसळतो. यावेळी पूलमधील आणि आजूबाजूचे लोक जोरजोरात हसू लागतात.
हा व्हिडीओ @irregular_strength नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने सहानुभूती व्यक्त करत लिहिले की, ती व्यक्ती लवकर बरी होईल अशी अपेक्षा आहे. तर आणखी एका युजरने फिरकी घेत लिहिले की, किमान स्विमिंग पूल तरी वाचला.