Snake Bites Man Viral Video : सोशल मीडियावर लाइक्स, कमेंट्स मिळविण्यासाठी अनेक जण जीव धोक्यात घालून व्हिडीओ बनवतात. त्यात जंगलातील साप हे व्हिडीओ बनविणाऱ्यांसाठी जणू काही खेळणंच झालं आहे. हे रील्सबाज व्हिडीओसाठी विषारी, बिनविषारी सापांबरोबर अनेकदा जीवघेणे खेळ करताना दिसतात. पण, हा खेळ कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे काहीच सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर सापांचा थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण जंगलात एकाच वेळी सात सापांच्या शेपट्यांंना धरून उचलत असतो. पण, त्याच्या या जीवघेण्या कृतीला एक साप फणा काढून तसेच सणसणीत उत्तर देतो. तो साप तरुणाच्या आधी खांद्यावर चावतो. त्यानंतर तो असा काही जीवघेणा हल्ला करतो की, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला असून, त्यावर नेटकरीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एकाचवेळी चक्क सात सापांशी खेळत होता तरुण
व्हिडीओमध्ये जंगलात एक तरुण एकाच वेळी एक-दोन नव्हे, तर चक्क सात सापांशी खेळत होता. यावेळी एका सापाने फणा काढत, आधी त्याच्या हातावर दंश केला. त्यानंतर तो साप कानाजवळ पोहोचला आणि त्यानं असं काही केलं की, ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण घनदाट जंगलात सात सापांबरोबर खेळताना दिसत आहे. त्याने एकाच वेळी हातात हिरव्या आणि काळ्या रंगाच्या या सापांच्या शेपट्या धरून ठेवल्यात. त्यामुळे हे साप सुटका करून घेण्यासाठी फणा बाहेर काढून वळवळतायत; पण तो तरुण मात्र सापांना हातात रशी पकडल्याप्रमाणे घेऊन उभा राहत असतो. इतक्यात एक हिरव्या रंगाचा साप तरुणाच्या हातावर हल्ला करतो. त्यानंतर फणा वर करून थेट त्याच्या कानाला दंश करतो. हे दृश्य पाहताना कुणालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, तो तरुण कानातून रक्त येत असतानाही न घाबरता उलट चक्क हसत असतो.
सापांचा हा भयानक व्हिडीओ @jepreaksiaden नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे; ज्यावर मोठ्या संख्येने युजर्स कमेंट्स करीत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले की, सुदैवाने हे साप विषारी नाहीत; अन्यथा या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असता. अनेकांनी हे दृश्य फार भयानक असल्याचे म्हटले आहे. तर काहींना त्या तरुणाला सापांबरोबर असे खेळू नकोस, असा सल्ला दिला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd