मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमधील ट्रॅफिकचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कधी कोणी भर ट्रॅफिकमध्ये नाचताना दिसत, तर कधी कोणी ट्रॅफिकच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसतात. यात भारतातील सर्वात मोठे आयटी हब म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरातील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे दररोज चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या ट्रॅफिकच्या परिस्थितीचे अनेक फोटो आणि मिम्स दररोज व्हायरल होत असतात. यात आणखी नवी मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी ट्रॅफिकच्या समस्येवर समर्पक भाष्य करणारी आहे.
कावल ओबेरॉय नावाच्या एका ट्विटर युजर एका ठिकाणी जात होता, यासाठी त्याने रॅपिडो बाईक राइड निवडण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने तो प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकतो. ट्रॅफिक सुटण्याची वाट पाहत असताना ओबेरॉयला आपल्या स्मार्ट वॉचवर काहीतरी मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये
तो रस्त्यावर सायकल चालवत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात तो सायकलने नाही तर बाईकने जात असतो. पण बाईकची स्पीड ट्रॅपिकमुळे सायकलप्रमाणे झाली त्यामुळे असा मेसेज दिसला. त्याने ट्विटरवर स्मार्टवॉचचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “बंगळुरूचे ट्रॅफिक किती वाईट आहे? मी रॅपिडो बाईकने जात होतो पण माझ्या स्मार्ट वॉचला वाटले की मी सायकल चालवत आहे. सध्या ही पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामुळे ती मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
बंगळुरुच्या ट्रॅफिकच्या समस्येवर मजेशीर पोस्ट व्हायरल होण्यास त्यावर टीकात्मक पोस्टही शेअर केल्या जातात. यात सिल्क बोर्ड जंक्शन किंवा मराठल्ली येथे ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर चालकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो, परंतु यामुळे त्यांना काही मजेदार कंटेन्ट तयार करण्याची संधी देखील मिळते. या पोस्टवर एका युजरने ते स्मार्ट वॉच कोणत्या कंपनीच आहे असं विचारल आहे. तर काहींना बंगळुरुच्या ट्रॅफिकबद्दल आप-आपले अनुभव शेअर केले आहेत.