Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामध्ये लहान मुलांचे व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतात. कधी कधी लहानगे असं काही करतात की मुर्तीपेक्षा किर्ती महान असं म्हणावं लागेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मूल एका तरुणाशी भांडताना दिसत आहे. लहान मुलगा बघून हा तरुण मुलांना गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात. पण हा चिमुकला घाबरण्याऐवजी पुन्हा त्यावरच हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छोटा पॅकेट बडा धमाका
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मूल आणि एक तरुण दिसत आहे. तरुणाने मुलाचा गळा पकडून ठेवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. साधारणपणे अशा परिस्थितीत कोणीही घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करेल. किंवा लोकांना मदतीसाठी आरडा-ओरडा करेल. पण हा चिमुकला तसं काही करत नाही. त्याने प्रत्युत्तर देत तरुणाच्या टी-शर्टची कॉलर पकडली.यानंतर तरुणाने मुलाचा हात काढून दोन्ही हातांनी त्याची मान पकडली. आणि यानंतर तो मुलाला ढकलतो. त्यानंतर मुलगा पुढे येतो आणि तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला लाथ मारतो. एका चिमुकला आणि तरुणाच्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते; प्राण्यांना किती कळतं पाहा, VIDEO पाहून कराल कौतुक
लोक मुलाचे कौतुक करत आहेत
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकसवर @gharkekalesh नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजार वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे लोक कौतुकही करत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले. ‘छोट्या पॅकेटने चमत्कार केला.’कमेंट करताना दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हा छोटू हा एक मोठा धमाका आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘छोटा-मोठा असा फरक नसतो, ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मोठे असण्याने काही फरक पडत नाही, लढण्यासाठी तुमच्याकडे हृदय असणे आवश्यक आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मोठे झाल्यावर छोटे पॅकेट काहीतरी बनेल.’