अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रस्त्यावर घागरा आणि स्नीकर्स घालून गरबा डान्स करणाऱ्या एका भारतीय तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण त्याचा गरबा डान्स नव्हे तर त्याने परिधान केलेला घागरा आणि स्नीकर्स होय. एक पुरूष असून त्याने स्त्रियांचे कपडे परिधान करत भररस्त्यात डान्स केलाय. म्हणून लोक मोठ्या कौतुकाने हा व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा या तरूणाच्या कलेला दाद द्याल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गरबा डान्स करणाऱ्या या तरूणाचे नाव जनील मेहता असं आहे. जनील मेहता हा गुजराती असून सध्या तो न्यूयॉर्कमध्ये राहतो. तो एक कोरिओग्राफर असून डान्स करणं हा त्याचा छंद आहे. सोशल मीडियावरही याची बरीच मोठी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल २ लाख ३९ हजार इतकी फॅन फॉलोइंग आहे. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान स्टारर ‘हम दिल दे चुके सनम’ मधील ‘ढोली तारो ढोल बाजे’ गाण्यावर डान्स केलाय. यामध्ये त्याने घागरा आणि स्नीकर्स परिधान करत हा डान्स केलाय. “आपण वर्षभर नवरात्र का साजरी करू शकत नाही? फक्त #Miniskirts आणि @vastra_designer असेल तर आपण कधीही गरबा डान्स करू शकतो!” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ त्याने शेअर केलाय.
आणखी वाचा : Aishwarya Rai ची डुप्लिकेट तुम्ही पाहिलीय का? या VIRAL VIDEO ला २४ मिलियन व्ह्यूज
या व्हिडीओमध्ये गरबा डान्स करत असताना घागरा आणि स्नीकर्स अगदी परफेक्ट पद्धतीने कॅरी केले आहेत. त्याचा हा डान्स पाहताना तुम्ही आपली नजर हटवू शकणार नाहीत इतका अप्रतिम डान्स त्याने या व्हिडीओमध्ये सादर केलाय. डान्स करताना या तरूणाने आपल्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स दिले आहेत, ते पाहून सारेज जण त्याचे चाहते होऊ लागले आहेत. एक पुरूष असून त्याने मुलींचा घागरा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कॅरी केलाय, याबद्दल नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : ‘मेरे सैंया सुपरस्टार’ गाण्यावर डान्स करत नवरीबाईने नवरदेवाचं केलं स्वागत, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : आपच्या महिला आमदाराला सर्वांसमोर कानशिलात लगावली, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तरूणाने परिधान केलेल्या कपडे आकर्षणाचा विषय ठरले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत त्याच्या कलेचं कौतुक करताना दिसत आहेत.