मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल चोरी जाणार नाही, याची काळजी घेत असतो. मात्र आता मोकळ्या, विनागर्दी असलेल्या मेट्रो स्टेशनवरही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. स्मार्टफोन हा आता प्रत्येकाचाच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा स्थितीत जर स्मार्टफोन हरवला तर आपण सगळेच घाबरतो. याचं कारण मोबाईलमध्ये आपली खासगी माहिती, तसंच फोटो, व्हिडीओ असतात जे दुसऱ्याच्या हाती लागण्याची भीती असते. यासह तुमच्या मोबाईलचा वापर करत पैशांचा व्यवहार किंवा घोटाळाही केला जाऊ शकतो. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

ट्रेनमध्ये अशी केली जाते मोबाईल चोरी

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Mumbaikars saved the young man's life while overhead wire accident shocking video goes viral
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
madhuri dixit rents out her andheri west office space
माधुरी दीक्षितने भाड्याने दिलं अंधेरीतील ऑफिस! दर महिन्याचं भाडं किती? आकडा वाचून थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण प्लॅटफॉर्मवर उभा राहून मेट्रोची वाट पाहात होता. तेवढ्यात त्याच्या शेजारी एक चोर येऊन उभा राहिला. सुरूवातीला या चोरानं त्या तरुणाला आपल्या बोलण्यात गुंग केलं. दरम्यान तो मोबाईल फोनचं निरिक्षण करत होता. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली. अन् चोराला मोबाईल उडवण्याची संधी मिळाली. मेट्रोचे दरवाजे उघडले. अन् तो तरुण डब्यात चढला. पण दरवाजे बंद होण्याआधीच त्या चोरानं मोबाईल हिसकावला. आणि तो पळून गेला. मेट्रोचा दरवाजा बंद झाल्यामुळे त्या तरुणाला बाहेर पडणं शक्य झालं नाही.

प्रवास करताना ही चूक करणं टाळा

खरं तर या तरुणाचा मोबाईल चोरीला गेलाच नसता जर त्यानं शेजारी उभ्या असलेल्या चोराला वेळीच ओळखलं असतं. कारण त्या चोराच्या हालचाली संशयास्पद होत्या. मात्र त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असल्यानं अशी घटना घडली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: अद्भुत! मुंबईत नॅशनल पार्कमध्ये दिसला हरणांचा कळप, चक्क २ सेकंदात ओलांडला रस्ता

व्हिडीओ पाहून नोटकरीही संतापले असून रोज अशा गोष्टींना सामोरे जावं लागत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. अनेकदा कारवाई करुनही या घटना कमी होताना दिसत नाहीत.

Story img Loader