लॉटरी लागणं हे अनेकांचं स्वप्न असतं. जगभरात अनेक देशांत लॉटरीचा मोठा व्यवसाय आहे. अनेक लोक विविध माध्यमातून लॉटरीची तिकीटं घेऊन नशीब अजमावत असतात. अतिशय मोजक्या लोकांना लॉटरीत यश मिळत असतं. अमेरिकेत एका व्यक्तीने लॉटरीमध्ये लाखो रुपये जिंकले आहेत. मात्र यासाठी त्याने नशीबाला नाही तर आपल्या दिवंगत लाडक्या पाळीव कुत्र्याला याचे श्रेय दिले आहे. नेमकं काय झालं, हे पाहुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या ओहायो राज्यातील रॉजर्स सोर्स या व्यक्तीने नुकतेच वॉशिग्टंन येथील एका लॉटरीच्या दुकानातून पाच क्रमांकाच्या लॉटरीची दोन तिकीटं घेतली होती. यासाठी त्यांनी १-०-८-२-२ असा नंबर निवडला होता. जेव्हा लॉटरीचा ड्रॉ लागला तेव्हा नेमका रॉजर्स यांनी विकत घेतलेल्या क्रमाकांला ५० हजार डॉलर्सची लॉटरी लागली. भारतीय रुपयांमध्ये जवळपास ४१ लाख रुपये होतात. विजेता ठरल्यानंतर रॉजर्स यांनी नशीबाचे आभार मानन्याऐवजी आपल्या पाळीव कुत्र्याचे आभार मानले.

हे वाचा >> ‘नशीब असावं तर असं…’ महिलेने क्षणात शोधून काढलं जमिनीत गाडलेलं गुप्तधन; VIDEO पाहून युजर्स करतायत कमेंट

रॉजर्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी हा क्रमांक आपल्या दिवंगत पाळीव कुत्र्याच्या परवान्यावरून घेतला होता. रॉजर्स यांच्याकडे जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले होते. त्याच्या आठवणीत रॉजर्स यांनी कुत्र्याच्या परवाना क्रमाकांचेच लॉटरी तिकीट घेतले होते, अशी माहिती युपीआय डॉट कॉम या साईटने दिली आहे.

हे ही वाचा >> गणेशोत्सवानिमित्त बँका किती दिवस राहणार बंद; वाचा सप्टेंबरमधील सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

रॉजर्स पुढे म्हणाले की, मी दोन लॉटरीची तिकीटे घेतली होती. त्यापैकी माझ्या पाळीव कुत्र्याच्या परवाना क्रमाकांच्या तिकीटाला लॉटरी लागली आहे. जेव्हा ड्रॉ काढला जात होता, तेव्हा मी घरी बसून टीव्हीवर पाहत होतो. माझ्या तिकीटाचा क्रमांक घोषित झाल्यानंतर मला क्षणभर विश्वासच बसेना. मला सुखद धक्का बसला. आता या पैशांतून मी माझे कर्ज फेडू शकतो, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man wins 42 lakh in lottery all thanks to his late dog here is what happened kvg
Show comments