देशाच्या सीमेवर शदीद झालेल्या जवानांना देशवासीय कँडेल मार्च आणि मोर्चे काढून श्रद्धांजली वाहतात. परंतु दिल्लीच्या एका तरुणाने शहीद जवानांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे. या तरुणाने चक्क स्वतःच्या शरीरावर तब्बल ५९१ टॅटू गोंदवूव शदीद जवानांना श्रद्धांजली वाहीली आहे. ३० वर्षीय अभिषेक गौतम असे त्या तरुणाचे नाव आहे. तो इंटिरिअर डिझायनर म्हणून कार्यरत आहे.
अभिषेकने कारगील युद्धात शहिद झालेल्या जवानां आदरांजली देण्याचे ठरवले आणि चक्क स्वत:च्या शरीरावर तब्बल ५९१ टॅटू गोंदवले. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या ५९१ सैनिकांची नावे अभिषेकने गोंदवली आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची रेखाचित्रे त्याने गोंदवली आहेत.
५९१ टॅटू गोंदवण्यासाठी अभिषेकला ८ दिवसांचा कालावधी लागला. जून २०१९ पासून अभिषेक आपल्या दुचाकीवरून देशभर भ्रमंती करणार असून या प्रवास तो शहिदांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. तब्बल १५ हजार किलोमीटरचा प्रवास तो करणार आहे. २४ ते २६ जुलै कारगिल युद्ध दिनानिमित्त तो द्रास क्षेत्रात उपस्थित राहणार आहे.
‘मला माहिती आहे की, अनेकांना युद्ध हवे आहे, परंतु युद्ध हा उपाय नव्हे. युद्धादरम्यान खूप जवान मारले जातील, असे अभिषेक म्हणातो.