जोरदार पाऊस हाहाकार माजवतो. पावसामुळे पूर आल्यावर जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होते. लोकांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागते. शहरात पुरासारखी स्थिती निर्माण होते. पाण्यात लोकांची वाहने वाहून जातात. हैदराबादमध्येही पावसाने अशीच स्थिती निर्माण झाली आहे. नद्या नाल्यांना आलेल्या पुराप्रमाणे हैदराबाद येथील रस्त्यांवर पाणी वाहत आहे. बोराबंदा भागात एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये रसत्यांवरून वेगाने पाणी वाहत असून त्यात एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे या व्यक्तीला आपली दुचाकी वाचवता आली नाही. दुचाकी वाहून गेली. दुचाकीसह ही व्यक्ती देखील वाहून जात होती, मात्र स्थानिकांनी तिला बचावले, त्यामुळे जीवितहानी टळली. एएनआयने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Viral video : महिला खेळाडूची फिल्डिंग पाहून नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा, चौकार वाचवण्यासाठी गेली अन बघा काय केले)

दक्षिणेत पावासाचा हाहाकार

हैदराबाद शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. शहरातील पूर परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले आहे. रोडवरील वाहने पाण्यात बुडाली आहेत. आंध्र प्रदेश, तलंगणा आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेकडो लोकांना बेघर व्हावे लागले. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशातील अनंतपूर शहरातील काही भागात पाणी साचले. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.