बंगळुरू हे टॅफिक जाम आणि कॉर्पोरेट जीवनामुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. सोशल मीडियावर शहरातील घडमोडी नेहमीच व्हायरल होत असतात ज्यामध्ये येथील नागरिक काम आणि आयुष्य यामध्ये संतुलन कसे साधतात हे दिसते. वाहतूक कोंडीमध्ये दुचाकीवर लॅपटॉप घेऊन काम करणाऱ्यांपासून ते वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानंतर वाटाणे सोलण्यापर्यंत अनेकांचे फोटो – व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. नुकताच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये तो सिनेमा हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
एक्स(ट्विटर)वर @KrishnaCKPS नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्वागत ओनिक्स थिएटरमध्ये सकाळच्या शोमध्ये सिनेमा हॉलमध्ये बसला होता. अंधारामध्ये त्याचा लॅपटॉप चमकत आहे. सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहताना तो व्यक्ती लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसते आहे. सतत कामामध्ये व्यस्त असलेल्या बंगळुरूची एक झलक यातून दिसते. काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधताना अनेक लोक असे काहीतरी करतात ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल.
हेही वाचा – Viral Video : कसा तयार केला जातो टकीला? लिंबू मिठासह का प्यायला जातो टकीला शॉट्स? जाणून घ्या कारण
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “@SwagathOnyx मध्ये सकाळच्या शोमधील दृश्य, हे अर्थात बंगळुरू आहे” व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विचारले, “सिनेमा हॉलमध्ये लॅपटॉप वापरण्याची परवानगी आहे का?” तर दुसरा व्यक्ती म्हणाला, “शो ऑफ करण्याची देखील हद्द पार केली. हा नवा फोटो बंगळुरूच्या सतत कामात व्यस्त असणाऱ्या लोकांसमोर येणाऱ्या समस्यांची आठवण करून देते.