Viral news: आपल्या घराचा सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत असतात मात्र तरीही मुलं बाबांपेक्षा आईच्याच जास्त जवळ असतात. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त असतं. बाप म्हणजे धाक दरारा हे पूर्वी अनेकांसाठी समीकरण होतं. आई आपल्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार “स्टीयरिंग” असतं तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, “वडील” म्हणजे “अर्जेंट ब्रेक” चा पर्याय असतात. अशातच एका व्यक्तीने आपल्या कारच्या मागे असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही म्हणाल याला म्हणतात वडिलांचा धाक. या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाडीच्या पाठीमागे लिहलेला मेसेज पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

याला म्हणतात वडिलांचा धाक

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, कारच्या मागे “आईचा आशिर्वाद आणि वडिलांच्या शिव्या” असा मेसेज लिहला आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आईविषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो पण वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते पण याचा अर्थ हा नाही की ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा वडिल व्यक्त होत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करायला घाबरतो.

बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मुळापासून नेहमी घट्ट असतं. आयुष्यात वडिलांचे स्थान खूप मोठे आहे त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करणे किंवा प्रेम व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. आपण सगळेच आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. कधी कधी कोणत्या शाळेतले धडे नाही तर आयुष्यात आलेली परिस्थितीतीही खूप काही शिकवून जाते. 

पाहा फोटो

https://www.instagram.com/reel/C8w3xmUs7Mp/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> VIDEO: “माऊली -माऊली काय सांगू…” पुणेरी पाटीनं वारकऱ्यांचं लक्ष वेधलं; आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी पाहाच

हा फोटो editor_sonu_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. घर घर की कहानी है ये, खरं आहे हे, याला म्हणतात वडिलांचा धाक अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.