Viral video: आजकालच्या काळात नातं टिकवणं अत्यंत कठीण होऊन बसलंय, याचे कारण जोडीदाराकडून वाढत चाललेल्या अवास्तव अपेक्षा ज्यामुळे अनेकांचं नातं काही काळातच संपुष्टात येत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. आजकाल सर्वांनाच परफेक्ट जोडीदार हवा असतो. जोडीदाराबाबत सगळ्यांच्या अनेक इच्छा असतात की जोडीदार ‘असा’ असावा वैगेरे वैगेरे… लग्नाआधीच्या भेटीगाठींमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण लग्नानंतर जोडप्यांमध्ये काही गोष्टींवरून वाद होत असल्याचं दिसतं. आयुष्यात योग्य जोडीदार मिळणे आणि त्याने नेहमी साथ निभावणे हे नक्कीच आव्हानात्मक असते.प्रत्येकाला आपलं लग्नानंतर आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुखदुःख तर येतातच मात्र ती झेलताना आपल्याबरोबर आपला जोडीदार योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. नात्याचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

आयुष्यात एक वेळ पैसा कमी असेल तरी चालेल; पण योग्य जोडीदार असणं महत्त्वाचं आहे. काही जण आपलं नातं नेहमीच नव्यासारखं ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाचा नेहमीच विचार करीत असतात. अशातच एका व्यक्तीनं आपल्या बायकोसाठी बाईकच्या मागे असं काही लिहिलंय की, त्यावरून तो आपल्या बायकोवर किती प्रेम करतोय हे दिसतंय. तसंच बायकोही नवऱ्याच्या सुख-दु:खांत त्याच्यासोबत उभी असणार हे यावरून स्पष्ट होतंय. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीची बायको खूप खूश होईल असं दिसत आहे. कारण या व्यक्तीने त्याच्या यशाचं सगळं श्रेय हे त्याच्या बायकोला दिलं आहे. एवढचं नाहीतर हेच त्यानं सगळ्यांना समजण्यासाठी चक्क बाईकच्या मागेही ते लिहलं आहे.

Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video Couple Caught On Camera Romancing While Sitting On Speeding Bike On Moradabad-Delhi Highway
VIDEO: “अरे जरा तरी लाज बाळगा” चालत्या बाईकवरच कपलचा रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे
Men in love
‘जेव्हा तो खरंच प्रेमात असतो…’ ऑफिसवरून घरी जाता जाता त्यानं तिच्यासाठी घेतलं खास गिफ्ट; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Video Of Elderly Couple
‘कदाचित हेच प्रेम असते…’ आजोबा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आजीने केले असे स्वागत; VIDEO पाहून भरून येईल मन
Extra marital affair kalesh wife caught over cheating her husband with other girl video viral
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; पण नवऱ्याआधी गर्लफ्रेंडच घाबरून गेली; खतरनाक VIDEO व्हायरल
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच

नेमकं काय लिहलंय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं नेमकं काय लिहलंय? तर या तरुणानं आपल्या बाईकच्या मागे, “मला घडविण्यामध्ये माझ्या पत्नीचे खूप मोठे योगदान आहे..थँक्स रितू” असं लहिलं आहे. आता तुम्हीच विचार करा हे जेव्हा बायको बघेल तेव्हा तिला किती आनंद होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास

सोशल मीडियावर mangesh_naik1 नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “या व्हिडीओमधील प्रत्येक शब्द खरा आहे” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, तर “एवढं कौतुक करणारा नवरा मिळायला नशीब लागतं” अशाही प्रतिक्रिया आल्या आहेत.

Story img Loader