Viral video: आजकालच्या काळात नातं टिकवणं अत्यंत कठीण होऊन बसलंय, याचे कारण जोडीदाराकडून वाढत चाललेल्या अवास्तव अपेक्षा ज्यामुळे अनेकांचं नातं काही काळातच संपुष्टात येत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. आजकाल सर्वांनाच परफेक्ट जोडीदार हवा असतो. जोडीदाराबाबत सगळ्यांच्या अनेक इच्छा असतात की जोडीदार ‘असा’ असावा वैगेरे वैगेरे… लग्नाआधीच्या भेटीगाठींमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण लग्नानंतर जोडप्यांमध्ये काही गोष्टींवरून वाद होत असल्याचं दिसतं. आयुष्यात योग्य जोडीदार मिळणे आणि त्याने नेहमी साथ निभावणे हे नक्कीच आव्हानात्मक असते.प्रत्येकाला आपलं लग्नानंतर आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुखदुःख तर येतातच मात्र ती झेलताना आपल्याबरोबर आपला जोडीदार योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. नात्याचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा