आजकाल अनेक कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करणं पसंद करतात. मात्र, घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर अनेक मजेशीर किस्से घडत असतात. या संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक लोक घरातून ऑनलाईन मिटींगमध्ये सहभागी होतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने Google मिटींगदरम्यान लॅपटॉपवर अंडरवेअर शोधत असतानाचा टॅब चुकून शेअर केला होता, ज्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. जो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण झालं होतं. सध्या अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याने मॅनेजरला ऑनलाइन मीटींगदरम्यान चित्रपट पाहताना पकडलं आहे.
ऑफिसची मिटींग सुरु असताना मॅनेजर ‘लस्ट स्टोरीज 2’ पाहत होता, ज्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. जो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या घटनेत ऑनलाइन मीटींगदरम्यान एका कर्मचाऱ्याने मॅनेजर चित्रपट पाहतानाचा स्क्रीनशॉट काढला. खरं तर, मॅनेजर चित्रपट पाहतानाची स्क्रीन बंद करणं विसरला आणि जेव्हा ऑफिसची ऑनलाईन मिटींग सुरु झाली त्यावेळी आधीचा टॅब ओपन झाल्यामुळे मॅनेजर पाहात असलेला लस्ट स्टोरीज-2 चित्रपट इतर लोकांनाही दिसू लागला.
हेही पाहा- कमी वेळात जास्त काम! भिंत बांधण्यासाठी मजुरांनी केला भन्नाट जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल
या घटनेचा स्क्रीनशॉट अनिता जॉबी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “आमचा मॅनेजर विसरला की तो त्याची स्क्रीन शेअर करत आहे आणि आता आम्ही त्याला मिटींगदरम्यान लस्ट स्टोरीज-2 पाहताना पकडले.” मात्र, दुसऱ्या ट्विटमध्ये अनिताने हा मॅनेजर तिच्या मित्राच्या कंपनीतील असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, अनिताने ट्विट डिलीट केलं, पण तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. यात तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा स्क्रिनग्रॅब दिसत आहे. एका यूजरने लिहिलं, “हे इंटरनेटचे युग आहे, एक चूक तुमची फजिती करु शकते.” दुसरऱ्याने लिहिलं, “मॅनेजरला विचारा, लस्ट स्टोरीज चित्रपट कसा आहे?” तर तिसऱ्याने लिहिलं, “ऑफिस मिटींगला अशी सार्वजनिक करू नका.” मात्र, अनेक नेटकऱ्यांनी नेटफ्लिक्सची स्क्रीन गुगल मीटवर कशी शेअर केली जाऊ शकते? असा प्रश्न विचारला आहे.