Video viral on social media: गरमागरम भजी, मंचूरियन भजी, वडा प्रत्येकाला आवडतो. तळलेले हे पदार्थ खायला जितकी मजा येते तितकंच बनवण्याचा कंटाळा. कारण उकळत्या तेलात हे पदार्थ तळताना त्या तेलातून निघणारी वाफही नकोशी असते. त्यामुळे त्या कढईसमोरही उभं राहणं नकोसं वाटतं. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती या कढईतील उकळत्या तेलातच हात घालून पदार्थ तळत असेल तर… साहजिकच फक्त सांगून यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये कांदा भजी सारखाच मंचूरियन भजीही खवय्यांच्या जवळचा पदार्थ झाला आहे. तरुणाईमध्ये तर ही भजी खूप फेमस आहे. अशाच एका मंचूरियन विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो चक्क उकळत्या तेलातून तळलेल्या भजी काढत आहे. यावेळी तो अगदी हसत खेळत हे काम करत आहे. त्याच्या याच शैलीमुळे तो सोशल मीडियावर खूप फेमसही झाला आहे. तरुणांनी फक्त व्यावसाय सुरु करायचे नाहीतर बाजारात काहीतरी वेगळं लोकांना दिलं तर तुम्हाला प्रतिसाद मिळतो, हे या तरुणानं सिद्ध केलं आहे. यामुळे त्याला त्रास होत नसेल असं नाही मात्र त्यातही कमीत कमी त्रास करुन घेऊन हा तरुण त्याची शैली ग्राहकांना दाखवतो हे विशेष.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तरुणीनं चक्क समुद्राच्या पाण्यात बुडवून खाल्ला ब्रेड; Video पाहून येईल किळस
मंचूरियन भजी खाण्यासठी कमी आणि त्याची ही शैली पाहण्यासाठी अधिक लोक त्याच्या गाड्यावर गर्दी करतात. याआधीही असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, मात्र हा तरुण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत हे कसं शक्य आहे, असं खरंच हा तरुण करतो का?, त्याचे हात भाजत नाहीत का? असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहेत. हा व्हिडीओ @pravin_kolambe’s या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत.