Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या मकर राशीत आहे आणि लवकरच तो राशी बदलणार आहे. मंगळ १५ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ०५.४२ वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी०८.५२ पर्यंत मंगळ ग्रह शनीच्या कुंभ राशीत राहील. मंगळाचा शनीच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे सर्व १२ राशींवर मोठा प्रभाव पडेल.

मेष – करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात. संपत्तीमध्ये वाढ होण्याचा योग निर्माण होईल. विशेष म्हणजे रिअल इस्टेटचे व्यापारी आणि उच्च अधिकाऱ्यांना मदत आणि आर्थिक प्रगतीची संधी मिळणार आहे. कौंटुबिक वातावारण आनंदी असेल. बहिण-भाऊ आणि मित्रांसह संबध सुधारू शकतात. पोटासंबधीत समस्या उद्भवू शकतात.

वृषभ- मंगळाच्या ग्रहचा राशी परिवर्तनाचा थेट परिणाम लष्करी क्षेत्र, क्रीडा जगत आणि राजकारणाशी संबंधित लोकांवर होईल. आक्रमकता भागीदारीत निर्णय घेण्यास अडथळा आणू शकते. वैयक्तिक संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण राहील. मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाबाबत चिंता असू शकते. कोणत्याही प्रकारचे मशीन किंवा वाहन चालवताना काळजी घ्या. पोट आणि हृदयाशी संबंधित आरोग्य समस्यांकडे लक्ष द्या.

मिथुन- उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. क्रीडा, राजकारण आणि यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या करिअरमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलांबरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शुभ आणि फलदायी प्रवास होतील. जुने कायदेशीर वाद मिटण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत जागरुकता वाढेल. मानसिक तणाव वाढेल.

कर्क- कर्क राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याबाबत जागरुक राहा. करिअरच्या क्षेत्रात पदोन्नतीमध्ये अडथळे येऊ शकतात. कायदेशीर वादात अडकू नका. वाद होऊ शकतो. सासरच्या (सासू-सासरे) आरोग्याची काळजी घ्या.

सिंह- राजनीतीचे क्षेत्र लोकांसाठी विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. मंगल ग्रहाचे गोचरमुळे भाग्याची साथ मिळेल. नोकरीत पदोन्नति आणि उन्नत आर्थिक योग होत आहेत. संपत्तीच्या खरेदी आणि विक्रीतून लाभ होऊ शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूकीतून धन मिळू शकते. अचानक धनलाभामुळे प्रसन्नता अनुभवू शकता. मोठा प्रवास करावा लागू शकतो.

कन्या – करिअरच्या क्षेत्रात पदोन्नतीची अपेक्षा करणाऱ्या लोकांना निराशेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराशी संबंधात कटुता येऊ शकते. ताप, त्वचा संबंधित आजार, अपघात इत्यादी आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

हेही वाचा – Maha Vipreet Rajyog: १० वर्षांनी ‘महा विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? बुधदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसा

तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ दुसऱ्या आणि सप्तम भावाचा स्वामी असून पाचव्या घरात प्रवेश करेल. या गोचरदरम्यान तुम्हाला तुमच्या मुलांची आणि तुमच्या भविष्याची काळजी असेल. स्वभावात चिडचिडेपणा राहील. नोकरीच्या क्षेत्रात खूप काम होईल. व्यवसायात मोठ्या नफ्याची अपेक्षा करू नका. कौटुंबिक संबंधांमध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्दी, खोकला, पाय दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ हा पहिल्या आणि सहाव्या घराचा स्वामी असून चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. या काळात तुम्ही अथक प्रयत्न करूनही यश मिळणे अशक्य वाटेल. विशेषत: सरकारी क्षेत्रात करिअरच्या पदोन्नतीच्या संधी मिळतील. व्यवसायात तुम्हाला समाधानकारक यश मिळेल. बचत कमी होईल, खर्च जास्त होईल. पोट आणि पाठदुखीशी संबंधित आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

धनु- धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ हा पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि या गोचरदरम्यान मंगळ तिसऱ्या भावात जात आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाऊन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला विशेष लाभ मिळेल आणि स्पर्धेत यश मिळेल. जोडीदाराबरोबरच्या नात्यात गोडवा राहील. वडिलांच्या उपचारावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.

मकर- वैयक्तिक विकासात तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ सामान्य असेल. अतिरिक्त खर्चामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवतील. परस्पर संबंधांमध्ये वाद टाळा. आरोग्याशी संबंधित समस्या वाढतील. पाय आणि गुडघेदुखी, पोटाशी संबंधित तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

हेही वाचा – १४ मार्च पंचांग व राशी भविष्य: गुरुवारी सूर्याचे गोचर मेष ते मीन राशीला करणार शक्तिशाली? तुमची रास काय सांगते?

कुंभ- करिअरच्या दृष्टीकोनातून हे संक्रमण चांगले राहील. नोकरीत नवीन संधी मिळतील. परदेश प्रवासाची प्रबळ शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या जोडीदाराबरोबरचे संबंध मैत्रीपूर्ण राहतील.

मीन- नोकरदारांसाठी काळ चांगला आहे. पदोन्नती आणि आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला राहील. जीवनात सुख-समृद्धी येईल.

Story img Loader