Mangalagaur Viral Video : सासू-सुनेचे नाते हा भारतीय कुटुंब संस्कृतीतील अविभाज्य भाग आहे. हे नाते अतिशय संवेदनशील नाते मानले जाते. मुलगी लग्न करून सासरी जाते, त्यावेळी तिथे सासू तुमच्या आईची भूमिका पार पाडत असते. अनेकदा लग्नानंतर नव्याने तयार झालेल्या नात्यात खटके उडतात आणि दुरावा निर्माण होतो. काही वेळ दोघी एकमेकींचे तोंडदेखील पाहत नाहीत. त्यामुळे आजवर तुम्ही सासू-सुनेच्या कडाक्याच्या भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील; पण आता सासू-सुनेच्या मजेशीर भांडणाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का? नसेल तर लगेच बातमीतील व्हिडीओ पाहा, जो तुम्हालाही खूप आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सासू-सुनेच्या भांडणाचे मजेशीर गाणे

महाराष्ट्रात श्रावण महिन्यात खेळल्या जाणाऱ्या मंगळागौरीच्या खेळांविषयी तुम्हाला माहीतच असेल. त्यात खेळांमध्ये सासू-सूनेचे किंवा सवतीचे भांडण हा एक खास खेळ असतो. त्यात सासू-सुनेच्या नात्यावर आधारित गाणी म्हटली जातात आणि झिम्मा, फुगड्या, पारंपरिक नृत्य केले जाते. व्हिडीओमध्ये तु्म्ह पाहू शकता की, मंगळागौरीच्या खेळातील अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई हे सासू-सुनेच्या भांडणाचे मजेशीर गाणे म्हणत सासू आणि सून पारंपरिक नृत्य करीत आहेत.

सासू-सुनेतील गोड नाते

यावेळी तिथे उपस्थित महिलादेखील ते गाणे म्हणत टाळ्या वाजवून दोघींना प्रोत्साहन देत आहेत. यावेळी सासू-सुनेतील एक अगदी गोड नाते स्पष्ट दिसून आले, दोघी अगदी एकमेकांच्या मैत्रिणी असल्याप्रमाणे हा खेळ हसत-नाचत खेळत आहेत. त्यात टाळ्या वाजवत एकमेकींना कंबरेने धक्का देत हसत-खेळत हा खेळ त्या खेळत होत्या.

Read More Trending news : Dahi Handi 2024 : “भारीच नाचला आपला भाऊ” मुंबईतील दहीहंडी उत्सवातील कधीही जुना न होणारा Video, पाहून हसून हसून व्हाल लोटपोट

दरम्यान, सासू-सुनेच्या या मजेशीर भांडणाचा व्हिडीओ nath_and_heels नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका महिला युजरने कमेंट केली, “माझं तर असं करता करता खरंच भांडण होईल.” दुसऱ्या युजरने लिहिले, “एक नंबर सासूबाई.” तिसऱ्या युजरने लिहिले, “खरंच खूपच सुंदर. लय भारी सासूबाई, वरचढ सूनबाई.”