टोलचा प्रश्न आपल्याकडे फार सेन्सिटिव्ह आहे बाबा! एकट्या महाराष्ट्रात टोलच्या विरोधात कितीतरी आंदोलनं पेटली आहेत. स्वत:ला जगाचे राजे समजणारे नेत्यांचे चिरंजीव किंवा लक्ष्मीपुत्र टोलनाक्यांवर टोल मागितला की मोठा अपमान झाल्याचा आव आणतात. टोलबूथची अनेकदा तोडफोडही होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण मंगळूरमध्ये झालेल्या एका प्रकाराच्या वृत्ताने सगळ्यांची झोपच उडाली. कोची-मुंबई हायवेवरून आपल्या गाडीने प्रवास करणाऱ्या एका डाॅक्टरने उडुपीजवळ एका टोल बूथवर आपलं डेबिट कार्ड वापरत टोल भरला. तिथल्या टोल कर्मचाऱ्याने अतिशय तत्परतेने ते कार्ड स्वाईप करून टोलची रिसीट डाॅक्टरसाहेबांकडे दिली. टोलची रक्कम होती ४० रूपये. इथवर सगळं ठीक होतं. आणि या डाॅक्टरने नेहमीसारखी डेबिट कार्ड स्लिप आपल्या खिशात सरकवली. पण दोन मिनिटांनी त्यांना जो एसएमएस आला त्याने डाॅक्टरांनाच हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला.

बँकेने त्यांना पाठवलेल्या एमएसएसनुसार त्यांच्या खात्यातून ४ लाख रूपये टोलसाठी वळते करून घेतले होते! टोल कर्मचाऱ्याने घाईगडबडीत शून्य जास्त टाकल्याने किंवा स्वाईपिंग मशिनमध्ये काही बिघाड झाल्याने असं झालं असणं शक्य आहे. पण या टोल कर्मचाऱ्याच्या निदर्शनाला ही चूक आणल्यावर आपण असं काही केलेलं नसल्याचा त्याने दावा केला.

नोटाबंदीनंतर आपण सगळेजण डिजिटल पेमेंटकडे वळलो आहोत. डेबिट कार्ड स्वाईप केल्यावर समोरचा विक्रेता आपल्याला कार्ड स्वाईप मशिनमध्ये पिन नंबर टाकायला सांगतो. त्यावेळी आपण त्या स्वाईप मशीनमध्ये त्या विक्रेत्याने किती रक्कम टाकली आहे याची पडताळणी करत नाही तसंच आपल्याला मिळालेल्या पावतीवरही कोणता आकडा टाकला गेला आहे याची शहानिशा न करता आपण ती खिशात टाकत पुढे जातो. मंगळूरमध्ये झालेल्या या प्रकाराने या सर्व बाबतीत आपण किती सजग असणं आवश्यक आहे हे समोर आलंय.

[jwplayer kDt9gKcj]