Mango Omelette Viral Video: उन्हाळा आला की फळांची राजा आंबा बाजारात येतो. बरेच लोक या फळाचा आस्वाद घेण्याची प्रत्येक संधी शोधत असतात. बहूतेक लोक आंबा जसा आहे तसा खाण्याला प्राधान्य देतात तर अनेकांना आंब्यापासून तयार केले जाणारे पदार्थ आवडतात. बहूतेक घरांमध्ये कच्चा कैरीचे लोणचं तयार केलं जाते तर काहींच्याकडे आंब्याचा आमरस खायला आवडतो. तसेच आंब्याचे अनेक उत्तम पदार्थ आहेत पण सध्या विचित्र खाद्यपदार्थांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यात आंब्याचा हंगाम असल्यामुळे अनेक प्रयोग आंब्यावर केले जात आहेत. काही दिवासांपूर्वी आंबा पाणीपूरी, आंबा पिझ्झा असे विचित्र खाद्यपदार्थ तयार केले होते आता त्यात नवीन पदार्थाची भर पडली आहे. यावेळी आंब्यासोबत अंड्यावरही प्रयोग केला आहे. सध्या सोशल मिडियावर आंबा ऑम्लेटचा व्हिडिओ चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना धक्का बसला आहे तर काहींचा संताप होत आहे.
स्ट्रीट फूड विक्रेत्याने बनवलं आंबा ऑम्लेट
सामान्यतः, बऱ्याच लोकांना अंड्यापासून तयार केलेले पदार्थ आवडतात ज्यात ऑम्लेट सर्वांच्याच आवडीचे आहे. दुसरीकडे, आंबा हे उन्हाळ्यातील सर्वात खास फळ असल्याने सर्वांनाच ते आवडते. दरम्यान, एक स्ट्रीट फूड विक्रेता आंबा आणि अंड्याचे मिश्रण करून ऑम्लेट तयार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
हेही वाचा – हर्ष गोयंकांनी शेअर केला दुरदर्शनचा जुना व्हिडिओ, लोक म्हणाले,” Ad आहे की Funny Video”
आंब्यासह आता अंड्यावर झाला विचित्र प्रयोग
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर thegreatindianfoodie नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ती विक्रेता सर्व प्रथम गरम तव्यावर तेल ओततो आणि तळण्यासाठी दोन अंडी फोडतो. मग तो बाहेर काढतो आणि उकडलेल्या अंड्यातील पिवळ बलक मिरची आणि मसाल्यांमध्ये मिसळतो. त्यात आंब्याचा रस मिसळतो. ते तयार झाल्यावर, तो हे मिश्रण तयार केलेल्या ऑम्लेटवर ओततो. पण रेसिपी इथेच संपत नाही. याव्यतिरिक्त, तो मसाले आणि आंब्याच्या रसात उकडलेले अंडी मिसळतो.
हेही वाचा – एम. एस. धोनी नव्हे Captain Dhoni Sparrow! AIच्या मदतीने आर्टिस्टने केली कमाल! व्हायरल फोटो पाहिला का?
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले
सध्या हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंच८ लाख २२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ८ हजारांहून अधिक लोकांनी याला पसंती दिली आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यकारक कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘आंबा कोपऱ्यात रडत आहे’ असे लिहिले. दुसर्या यूजरने लिहिले की, ‘तुम्ही ही राक्षसी कृत्ये का करत आहात’, तिसर्या यूजरने कमेंट करत लिहिले की, आता असे अत्याचार करणे बंद करा.
आणखी एका यूजरने लिहिले की, ‘कृपया आंब्याचा ज्यूस खराब करू नका.’ दुसर्याने लिहिले, “हे उलटी सारखे आहे.” तिसर्याने पोस्ट केले, “हे थांबवा. फक्त थांबवा.” पाचव्याने लिहिले, “मला फक्त एकच विचारायचे आहे. तुम्हाला यातून काय आनंद मिळत आहे?”