सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आपण कित्येक व्हायरल व्हिडिओ रोज पाहतो ज्यापैकी काही मजेशीर असतात, काही आश्चर्यकारक असतात तर काही सर्वांना थक्क करणारे असतात. आजाकर फ्युजन फूडचा ट्रेंड व्हायरल होत आहे. विविध संस्कृतीचे खाद्यपदार्थ एकत्र करून किंवा त्याच्या पाककृतीमध्ये काहीतरी बदल करून लोक नवनवीन प्रयोग करत असतात. हे विचित्र खाद्यपदार्थ लोक आवडीने खात खातात देखील. सध्या अशाच एका विचित्र खाद्यपदार्थाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा विचित्र खाद्यपदार्थात चक्क आंब्यावर प्रयोग केला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात…आपला सर्वांचा आवडता आंबा. व्हायरल व्हिडिओ पाहून आंबा प्रेमी लोक चांगलेच संतापले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये आंबापाव नावाचा पदार्थ तयार करण्यात आला आहे. हे विचित्र फ्युजन ऐकूनच नेटकरी चक्रावले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांनी रोष देखील व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर द भुक्कड कॅफे नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे पोस्ट केल्यापासून व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.व्हिडिओच्या सुरवातीला एक व्यक्ती मँगो पाव खाताना दिसत आहे. त्यानंतर मँगो पाव कसा बनवला जातो याची रेसिपी दाखवली आहे. प्रथम काही पाव तेलात तळले जातात. त्यानंतर पाव मधोमध कापून त्यात आंब्याच्या फोडी आणि क्रीम ठेवली जाते. नंतर तो पाव आम्रमध्ये बुडवला जातो. त्यानंतर पिठीसाखर मध्ये पुन्हा बुडवला जातो. त्यानंतर तो सर्व्ह केला जातो. एक व्यक्ती आनंदाने हा पदार्थ खाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून अनेकां हा पदार्थ खाण्याची इच्छा असल्याचे सांगितले तर अनेकांनी या रेसिपीवर टिका केली आहे.

हेही वाचा – इलेक्ट्रिक शॉक लागताच चिमुकला झाला बेशुद्ध, महिला डॉक्टरने CPR देऊन वाचवला जीव, Viral Video एकदा बघाच

व्हिडीओवर कमेंट करताना एक जण म्हणाला,” तळलेला पाव, भरपूर क्रिम आणि साखर = मधुमेह” दुसरा म्हणाला, “कोण आहेत हे लोक, विशेषत: या रीलमध्ये दिसणारे लोक, कृपया आवडते फळ कशाबरोबरही जोडून खाणे थांबावा आणि रेसिपी बिघडवू नका”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango pav after seeing the strange recipe video goes viral snk
Show comments