Mango price in japan: आंबे खायला कुणाला आवडत नाहीत. सध्या बाजारात हापूस आंब्यांपासून विविध जातीच्या आंब्यांची चलती आहे. प्रत्येक आंब्याला त्याच्या चवीनुसार दर मिळतो. त्यामध्ये कोकणातील हापूस हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता सातासमुद्रापार पोहोचलाय.आंब्याच्या विविध प्रजातींमध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागात पिकणाऱ्या हापूस आंब्याला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठी मागणी आहे. दरम्यान आपल्याकडे सहज मिळणारा हा हापूस आंबा जपानमध्ये किती रुपयांना मिळतो माहितीये का? भारतीय वंशाची एक तरुणी जपानमध्ये कामासाठी राहत असून भारतातील आंब्यांची तिथे नेमकी काय किंमत आहे हे तिनं सांगितलं आहे. यावेळी भारतात पिकणाऱ्या आंब्याची किंमत जपानमध्ये काय आहे हे जाणून तुम्हीही अवाक् व्हाल. या भारतीय तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जपानमध्ये ५ आंब्यांची किंमत किती ?
उन्हाळ्याच्या कालावधीत तर बऱ्याच घरांमध्ये आमरसाच्या बेत आखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत आंब्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये या कालावधीत विविध प्रजातीचे आंबे दाखल होतात.तसेच भारतामध्ये हापूस आंबा व्यतिरिक्त दशेरी तसेच लंगडा, केशर सारख्या इतर आंब्याच्या प्रजाती देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. भारत हा आंब्याचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून देखील जगाच्या पाठीवर ओळखला जातो.साधारणपणे दीड ते दोन हजार रुपये डझन इतक्या किमतीने हापूस आंबा भारतात विकला जातो. आपल्या घरापासून लांब नोकरीसाठी राहणारे भारतीय नेहमीच भारतील वेगवेगळ्या गोष्टी मिस करत असतात. त्यात उन्हाळ्यातला आंबा जर बाहरेच्या देशात मिळाला तर सोन्याहून पिवळं. मात्र याची किंमत बघूनच काहीवेळा नको वाटतं. मात्र जपान मधल्या या तरुणीने हे आंबे घेतले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भारतातल्या आंब्याची जपानमध्ये किंमत काय?
व्हिडीओमध्ये तरुणीनं सांगितल्याप्रमाणे जपानमध्ये सहज आंबे मिळत नाही. काही ठरावीक ठिकाणीच हे आंबे मिळतात. त्यानुसार जपानमध्ये ५ आंबे भारतीय चलनाप्रमाणे १ हजार ३३७ रुपयांना मिळतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अवघ्या ३ सेंकदाचा फरक अन्…वादळादरम्यान जोगेश्वरीतील मेघवाडीत नेमकं काय घडलं? थरारक VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ आपल्याच भारतीय वंशाची kavi_gomase या तरुणीच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या तरुणीनं स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३६६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर भारतीय नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ही तरुणी जपानमधल्या वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचवत असते.