ईशान्येकडील राज्यांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस, वादळ, भूस्खलन अशा कित्येक नैसर्गिक संकटांचा सामना लोक करत आहेत. पूरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारनं मदत जाहीर केली आहे. अनेकजण आपला जीव धोक्यात घालून पूरग्रस्ताची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. अशातच इंफाळमधला एक फोटो मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला आहे. हा फोटो मणिपूरचे आयएएस अधिकारी दिलीप सिंग यांचा आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते जीव धोक्यात घालून पाण्यात उभे होते. कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात उभं राहून मानवी साखळी तयार करून ते पूरग्रस्तांची मदत करत होते.
नागरिकांना मदत करण्याची त्यांची सुरू असलेली धडपड नक्कीच कौतुकास पात्र होती. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बमन इराणी यांनीही ट्विट करून दिलीप सिंग यांचं कौतुक केलं आहे. देशाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या अशा लोकांना पाहून नेहमीच आनंद होतो. दिलीप सिंग यांच्या जिद्दीला सलाम असं ट्विट करत बमन इराणी यांनी त्यांचा फोटोही ट्विट केला आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विट करत दिलीप सिंग यांचं कौतुक केलं आहे.

Story img Loader