Manipur Violence Video: मणिपूर हिंसाचारावरून अजूनही केंद्र सरकारवर ताशेरे ओढले जात असताना, लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फेसबुक वर शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. या व्हिडिओ मध्ये एक इमारत कोसळताना दिसते आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज मणिपूर अपडेट्सने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले:
Again Leak video ?, KuKi Destroying Meitei House’s in Manipur
manipurisburning #manipurriots #ManipurOnFire #ManipurBurning #meitei #manipulators #kuki #ManipurNews #Manipur
आम्ही हि बातमी फॅक्ट चेक करेपर्यंत या पोस्टला १०२ शेअर होते.
तपास:
आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि कीफ्रेम वापरून व्हिडिओचा तपास केला. आम्हाला हा व्हिडिओ @civilengineeringbykd’. इंस्टाग्राम पेज वर अपलोड केलेला मिळाला,
हा व्हिडिओ २४ मे रोजी अपलोड केला गेला होता, याचा अर्थ हा व्हिडिओ जुना आहे तसेच आम्हाला हा व्हिडिओ टिकटॉक प्रोफाइल @ismailfidan4406 वर अपलोड केलेला सापडला.
यात, ‘#tbt #hatay #demolition #hataydefne #yikimekibi’ अशे हॅशटॅग्स वापरले होते. आम्हाला त्यांच्या प्रोफाइलवर विविध इमारती पाडण्याचे व्हिडिओ देखील सापडले आहेत.
या सगळ्या पोस्टमध्ये एक कॉमन हॅशटॅग वापरला होता ‘hatay’, आम्ही हा शब्द इंटरनेटवर शोधला आणि समजले की Hatay हा भूमध्यसागरीय किनार्यावरील दक्षिण तुर्की मधील प्रांत आहे.
आम्हाला तुर्कस्तानमध्ये इमारती पाडल्याच्या काही बातम्या देखील सापडल्या.
वृत्त अहवालात नमूद केले आहे की, ‘दुल्कादिरोउलु आणि ओनिकिसुबातमधील ११ इमारती आपत्कालीन घोषित करण्यात आल्या होत्या, ज्या शुक्रवारी पाडल्या जाणार होत्या, अनाडोलू एजन्सी (एए) ने वृत्त दिले.’ हा अहवाल १० मार्च २०२३ रोजी प्रकाशित झाला.
हे ही वाचा<< २४ वर्षीय तरुणीवर रस्त्यात भरगर्दीत अत्याचार करून हत्या; भयंकर Video ची खरी बाजू आली समोर…
निष्कर्ष: कुकी मेईतेईची घरे पाडताना दाखवणारा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे, व्हिडिओमध्ये दिसणारे घर तुर्कीमधील आहे.