मणिपूरच्या एका तरुणाने एक विक्रम केला आहे. मुख्य म्हणजे त्याने स्वतःचाच जुना विक्रम मोडून हा नवा विक्रम केला आहे. थॉनाओजम निरंजॉय सिंह (Thounaojam Niranjoy Singh) असे या मुलाचे नाव असून त्याने एका मिनिटात १०९ फिंगर पुश-अप्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. पूर्वी त्याने एका मिनिटात १०५ पुश-अप्स पूर्ण केले आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, अॅझ्टेक स्पोर्ट्स मणिपूरद्वारे, अॅझ्टेक फाईट स्टुडिओमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी हा प्रयत्न केला गेला होता.
मणिपूरच्या तरुणाने रचला विश्वविक्रम
थॉनाओजमचा, स्वतःचाच विक्रम तोडण्यासाठी करत असलेल्या पुश-अप्सचा व्हिडीओ एएनआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मणिपूरच्या थॉनाओजम निरंजॉय सिंहने गेल्या आठवड्यात एका मिनिटात सर्वाधिक फिंगर पुश-अप करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.’ असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनीसुद्धा हा व्हिडीओ ट्विट केला असून “एका मिनिटात सर्वाधिक फिंगर पुश-अप करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या मणिपुरी तरुण थॉनाओजम निरंजय सिंगची अविश्वसनीय शक्ती पाहणे आश्चर्यकारक आहे. मला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे!’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुस्लीम जोडप्यांमध्ये वाढतोय ‘Unboxing By Husband’ चा ट्रेंड; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
जाहिरातीत खराखुरा वाघ वापरल्याने Gucci ची झाली गोची; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
थॉनाओजमच्या आधी आणखी काही भारतीयांनी रचला होता विक्रम
आणखी एका भारतीयाने काही दिवसांपूर्वीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्याचे नाव प्रतीक मोहिते असे आहे. महाराष्ट्रातील प्रतीक मोहिते याच्या नावावर सर्वात कमी उंचीचा शरीरसौष्ठवपटू (पुरुष) म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याची उंची अवघी ३ फूट ४ इंच इतकी आहे. २०२०मध्ये चेन्नईच्या एका तरुणाने श्वास रोखून धरून सहा रुबिक क्यूब्स पाण्याखाली सोडवून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला.
इलियाराम सेकरने हा विक्रम अवघ्या २ मिनिटे १७ सेकंदांमध्ये पूर्ण केला. तो २०१३ पासून रुबिकचे क्युब्स सोडवत आहे. तो म्हणाला, पाण्याखाली दीर्घकाळ राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मी नियमित योगाभ्यास करतो.