बहुप्रतिक्षित राफेल विमाने अखेर भारतामध्ये दाखल झाली आहे. आज दुपारी अंबाला एअरबेसवर राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने लॅण्डींग केले. फ्रान्समधून २७ जुलै रोजी उड्डाण केलेली राफेल विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करुन दुबईमार्गे भारतामध्ये पोहचली. ही विमाने भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये फ्रान्सबरोबर राफेल करार झाला त्यावेळी संरक्षण मंत्री असणारे भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांची आज अनेकांना आठवण झाली. राफेल करारावरुन निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर पर्रिकर यांच्यावर झालेले आरोप त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिलेले क्लीन चीट यासर्वांसंदर्भात आज अनेक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी राफेल भारतात येण्यासाठी पर्रिकरांनी महत्वाची भूमिका बजावल्याची आठवण करुन देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
राफेलबद्दल नक्की काय घडलं?
> यूपीए सरकारने २००७ साली जगातील सहा विमाननिर्मिती कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले.
> त्या वेळी १२६ विमाने खरेदी करण्याचे ठरले होते. त्यांची किंमत ४२ हजार कोटी असेल असा अंदाज होता. प्रत्यक्ष खरेदी होईपर्यंत त्याची किंमत ७९ हजार कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज होता.
> जानेवारी २०१२ मध्ये राफेल या विमानाची निवड अंतिम झाली. कराराच्या अटींसंदर्भात दोन्ही देशांत एकमत होत नव्हते.
> नोव्हेंबर २०१४ मध्ये मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रिपदी आले. दसाँ कंपनी करारातील वादग्रस्त मुद्दय़ांबाबत कोणतेच ठाम वचन देत नसल्याने २०१५ साली जुना करार बासनात गुंडाळण्यात आला.
> एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात ३६ राफेल विमाने थेट फ्रान्स सरकारच्या मार्फत तातडीने विकत घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. जानेवारी २०१६ मध्ये दोन्ही देशांत राफेल विमान खरेदीबाबत सामंजस्य करार झाला. २०१६ साली करार झाला तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांनी भारताच्यावतीने करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
त्यानंतर २०१९ साली जानेवारी माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या पर्रिकर यांची राहुल गांधीनी भेट घेतली होती. या भेटीनंतर राहुल यांनी, राफेल करार करण्यामध्ये मनोहर पर्रिकरांचा काहीही संबंध नव्हता, किंबहुना त्यांना या कराराची माहितीदेखील नव्हती असा आरोप केला होता. या वृत्ताचा दाखला देत पर्रिकर यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होते. “आपण फक्त ५ मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही,” असे स्पष्टीकरण पर्रिकर यांनी दिले होते. त्यावेळी हे आरोप प्रत्यारोपाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यापूर्वीच म्हणजेच २०१८ साली डिसेंबर महिन्यात राफेल कराराच्या कथित घोटाळ्याच्या आरोपातून सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट दिली होती. या निर्णयानंतर भाजपाने आता राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी पर्रिकर यांनी ‘सत्यमेव जयते’ असा ट्विट करून अखेर सत्याचा विजय झाल्याचे म्हटले होते.
याच सर्व पार्श्वभूमीवर आज अनेकांना पर्रिकरांची आवर्जून आठवण झाली अनेकांनी पर्रिकर आज तुम्ही हवे होता अशी भावनिक साद घालत त्यांची आठवण काढली.
यांचे योगदान विसरता येणार नाही
We Never forget the most important contribution of Manohar Parrikar ji. We are always miss him.#RafaleInIndia #RafaleJets#ThankYouPmModiForRafale pic.twitter.com/Q1M7HwrMOm
— Pushpendra Kulshreshtha (@iArmySupporter) July 29, 2020
या आजच्या दिवसासाठी लढलेला माणूस
The only man behind #RafaleInIndia Is none other than manohar parrikar
Thank you #manoharparrikar Ji pic.twitter.com/Jepab2SUL6— Đesi Thug © (@desi_thug1) July 29, 2020
तुम्ही राफेल म्हणालात की मला पर्रिकर ऐकू येतं
You say Rafale, I hear Manohar Parrikar!
Finally Rafale in India #ThankYouPmModiForRafale pic.twitter.com/bvzLf4NKgq
— Harshadha Shirodkar (@shirodkarharshu) July 29, 2020
ही तर त्यांना खरी श्रद्धांजली
You say Rafale
I say Manohar Parrikar !Force behind upgrading Rafale from what Congress initially agreed on, fixing Meteor missile was one of those.
Rafale is real tribute to him. @narendramodi#RafaleInIndia pic.twitter.com/7BA5AC0nLh
— Gaurav Goel (@goelgauravbjp) July 29, 2020
करार आणि आजचा दिवस
23rd Sep’16: Deal for 36 Rafales was signed for IAF by then DM Manohar Parrikar.
29th Jul’20: Total 10 handed over. First 5 going to join the IAF fleet in Ambala AFS.
Rest 5 will remain in France for training missions.*12 pilots have got training. Others in advance phase.* pic.twitter.com/uVwRbW28NB
— 7ru7h (@7ru7h_1) July 29, 2020
आज ते असते तर…
Shree Manohar Parrikar jee would be Smiling from heaven seeing Rafale roaring in Indian Airspace
Bharat Mata ki Jai pic.twitter.com/7H6Y8gqrqJ
— The Random Indian (@randm_indianguy) July 29, 2020
आज तुमची आठवण आली
We Miss You and Will Remember you forever .
23rd Sep’16:
Deal for 36 Rafales was signed by Late Shri Manohar Parrikar ji ! pic.twitter.com/Kk55Br9ehI
—(@first_hindustan) July 29, 2020
तुमच्या प्रयत्नांमुळे
It was all because of sincere efforts of legendary late Manohar Parrikar ji today we are seeing Bharat doing lots of procurement including #Rafale .It was him who identified more than 3 Billion USD forgotten in USA Account for Defense Purchase. pic.twitter.com/Cn28Kqggf0
— Dipankar (@Shomes_quest) July 29, 2020
आठवण त्यांची…
Time to remember and thank late Mr Manohar Parrikar pic.twitter.com/kLy7oCcHzZ
— Partha R Chary(@rspchary) July 29, 2020
आर्ट आणि आर्टीस्ट
The Art #Rafale The Artist pic.twitter.com/xNVFIYTitd
— Vertigo_Warrior (@VertigoWarrior) July 29, 2020
खरे हिरो
Amazing and happy moment of Rafael Deal. Missing you our hero late Shri Manohar Parrikar ji..#RafaleInIndia #Rafale pic.twitter.com/dclUn90C3a
— Savant Dixit (@IMSavantDixit) July 29, 2020
हा आणखीन एक व्हायरल फोटो
Former Defense Minister, Late Shri #manoharparrikar ji, would be happy to see his efforts being completed today.#RafaleInIndia #Rafale pic.twitter.com/L2nMVs86dI
— Akshay Akki ಅಕ್ಷಯ್ (@FollowAkshay1) July 29, 2020
पर्रिकर यांचे नावच ट्विटरवर आज टॉप ट्रेण्डींग टॉपिकपैकी एक होते.