बहुप्रतिक्षित राफेल विमाने अखेर भारतामध्ये दाखल झाली आहे. आज दुपारी अंबाला एअरबेसवर राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने लॅण्डींग केले. फ्रान्समधून २७ जुलै रोजी उड्डाण केलेली राफेल विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करुन दुबईमार्गे भारतामध्ये पोहचली. ही विमाने भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये फ्रान्सबरोबर राफेल करार झाला त्यावेळी संरक्षण मंत्री असणारे भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांची आज अनेकांना आठवण झाली. राफेल करारावरुन निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर पर्रिकर यांच्यावर झालेले आरोप त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिलेले क्लीन चीट यासर्वांसंदर्भात आज अनेक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी राफेल भारतात येण्यासाठी पर्रिकरांनी महत्वाची भूमिका बजावल्याची आठवण करुन देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा