Manoj jarange patil Video: गेल्या ९ दिवसांपासून चालू असणारं मराठा आरक्षण आंदोलन अखेर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी स्थगित केलं. येत्या २ जानेवारीनंतर सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची अट सरकारनं मान्य केली. त्या आश्वासनावर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं बेमुदत उपोषण स्थगित केलं. साखळी उपोषण मात्र चालूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या या लढाईत अनेकजण जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहेत.
कलाकारांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातचं लहान मुलंही मराठा आरक्षणासाठी मोर्चे आणि उपोषणस्थळी पाहायला मिळाली. दरम्यान अशाच एका चिमुकल्यानं झोपेतही शिवरायांच्या पुतळ्याला नमन करतानाचं मनोज जरांगे पाटलांचं हुबेहूब चित्र रेखाटलं आहे.
या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिमुकल्यानं अतिशय सुंदर असं हुबेहुब मनोज जरांगे पाटील आणि शिवाजी महाराजांचा पुतळा असं चित्र रेखाटलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीपासून कशा पद्धतीनं त्यानं हे चित्र रेखाटलं आहे हे पाहायला मिळत आहे. या चिमुकल्याचं नावं शिवांश मयूर यादव असं आहे. या व्हिडीओला “मराठा योद्धा मनोज जरांगेंचं आमरण उपोषण, झोपेतही शिवरायांच्या पुतळ्याला नमन” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तुम्हीच पाहा या चिमुकल्याचा व्हिडीओ..
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मराठा आरक्षणावर केतकीच्या पोस्टपेक्षा कमेंटचीच जास्त चर्चा; “ताई ५५ मोर्चे शांततेत काढले तेव्हा झोपला होतात का?”
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @rutik_gadhave_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.