Manoj jarange patil rally video: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली आहे. काल १३ ऑगस्टला त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यासाठी नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातून शेकडो नागरिक दाखल झाले होते. प्रत्येक जण जसे जमेल तसे जरांगेंच्या सभेला आले. कुणी दुचाकी घेऊन आले, कुणी टेम्पो, कुणी ऑटो घेऊन आले. मात्र, यामध्ये चर्चा रंगली ती या आजीची. या आजी रॅलीसाठी चक्क स्कुटीवरून आलेल्या. या आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आजींचा दिलखुलास अंदाज अनेकांना भावलाय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतलेली ही वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की, बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आज्जी रस्त्यावर बिनधास्तपणे स्कूटी चालवीत आहेत. एवढेच नाही, तर आजी स्कूटी चालवताना त्या कॅमेरामध्ये बघून हातसुद्धा दाखवीत आहेत.

मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंचवटीतील तपोवन इथल्या मैदानावर जरांगे यांच्या जयजयकाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शांतता रॅलीला प्रारंभ झाला. हातात भगवे ध्वज घेऊन, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे फलक घेऊन मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली पंचवटी कारंजा येथून शहरातील विविध मार्गांवरून गेली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील जागेत या रॅलीचा समारोप झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल

सोशल मीडियावर @prafulrote8311 प्रफुल रोटे पाटील नावाच्या एक्स अकाउंटवरून या आजीबाईंचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला “नाशिक – संभाजीनगर रोड या आज्जी नाशिकला रॅलीसाठी निघाल्या. मराठ्यांची वाघीण शोभलात आज्जी तुम्ही… सलाम तुम्हाला”, अशी कॅप्शन लिहिली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे, “एक मराठा लाख मराठा”, तर आणखी एका युजरने “भारी.. Braveheart आज्जीबाई…”