कधी कधी जास्त हुशारपणादेखील अंगाशी येतो. बऱ्याच वेळा प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यापासून लांब राहा, प्राण्यांना त्रास देऊ नका, अशा प्रकारच्या पाट्या लिहिल्या जातात. मात्र, काही जण याकडे दुर्लक्ष करतात आणि पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास देतात किंवा सेल्फी काढतात. कधीकधी जास्त हुशारी करणे महागात पडू शकते; असे काहीसे घडले असल्याचे सोशल मीडियाद्वारे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ठिकाणी नुकसान होण्याची अपेक्षा आहे, त्या ठिकाणांपासून दूर राहणे चांगले. असे झाले नाही तर बिनदिक्कत संकट येऊ शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने एका प्राण्याला हलक्यात घेतले आहे. पुढच्याच क्षणी त्याचे काय झाले ते पाहून तुम्हाला हसू येईल. वन्य प्राण्यांपासून तुम्ही जितके अंतर राखाल तितके चांगले. जरी ते पिंजऱ्यात असले तरी, त्यांच्याशी कमीतकमी संपर्क ठेवणे शहाणपणाचे आहे अन्यथा ते कठीण होऊ शकते. ज्याला हे समजले आहे तो किमान वन्य राखीव क्षेत्रात कोणत्याही अपघाताचा बळी ठरणार नाही अन्यथा तो या माणसासारखाच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, अनेक तरस (Hyena) वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. एक व्यक्ती त्याच्या पिंजऱ्यात शिरली. कदाचित त्या व्यक्तीला वाटले की ते चावणार नाही, परंतु तरसाने त्याचा पाय पकडला. त्याने पाय तोंडात इतका घट्ट पकडला होता की तो चावल्यानेच मरणार असे वाटत होते. बऱ्याच त्रासानंतर जेव्हा दुसरी व्यक्ती मदतीला आली तेव्हा तरसाने त्याचा पाय सोडला, पण त्या व्यक्तीच्या पायावर जखम झाली होती.

(हे ही वाचा : अंबानींच्या लग्नसोहळ्यामुळे वाहतूक मार्गांत बदल; ट्रॅफिक ॲडव्हायजरी पाहून संतापले लोक, म्हणाले, “सरकारने मुंबईत…” )

तरसाने माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच घडल्याचे जाणकार सांगतात. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये तरस आढळतात, भारतात शरीरावर पट्टे असलेल्या प्रकारातले तरस आढळतात. कमी उंचीच्या टेकड्या किंवा जमिनीखाली बिळं करून हा प्राणी राहतो.  तरसाचा जबडा हा सर्व प्राण्यांपेक्षा शक्तिशाली असतो. त्याच्या जबड्यात जबरदस्त ताकद असते.’

येथे पाहा व्हिडीओ

लोक म्हणाले, ‘वेडा आहेस का?’

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sonseylan नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर भाष्य करणाऱ्यांची कमी नाही. एका युजरने लिहिले, “तरस खेळत असावा अन्यथा त्याचा पाय आतापर्यंत कापला गेला असता”. इतर काही वापरकर्त्यांनी म्हटले की, “हा माणूस वेडा असावा, जो अशा गोष्टी करत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mans attempt to approach hyena goes awry as animal clamps down on his legs video viral pdb
Show comments