सोशल मीडियावर धोकादायक स्टंक करणाऱ्या व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. नुकताच रेल्वेच्या छतावर चढून स्ंटट करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता आणखी एका धोकादायक स्ंटटचा व्हिडीओ समोर आला आहे. १३ मार्च रोजी एका व्यक्तीने महामार्गावर बाईकवर धोकादायक स्टंट केला. एका चाकावर बाईक चालवण्याचा स्ंटट करत असताना त्याच्या मित्राने त्याच्या मागे जात व्हिडीओ शुट करत आहे. हाच व्हिडीओ महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आणखी एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

बाईकस्वाराचा महामार्गावर स्टंट, बंगळूरू पोलिसांनी दिली प्रतिक्रिया
“ एका चाकावर बाईक चालवण्याचा हा धोकादायक स्टंट १३ मार्च २०२४ रोजी सकाळी ९:५० च्या सुमारास होसूर राष्ट्रीय महामार्गावरील चांदापुरा जंक्शनजवळ करण्यात आला. हा स्टंट करणारा बाईकस्वार नंबर प्लेट नसलेली दुचाकी वापरत आणि त्याचे मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत होते. त्यांच्या वाहनाचा क्रमांक AP39 EC1411 आहे,” असे X वर शेअर केलेल्या व्हिडिओचे कॅप्शनमध्ये सांगितले आहे. पोस्ट करताना बंगळुरू वाहतूक पोलिसांना टॅग केले आहे.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Shocking video : A rickshaw caught fire due to firecrackers
धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – विना तिकीट प्रवास करणाऱ्यांनी टीटीईला केली धक्काबुक्की!अशी घडली त्यांना अद्दल, पाहा Viral Video

एक्स वर शेअर केलेला व्हिडिओ येथे पहा:

बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि एसपी बंगळुरू ग्रामीण जिल्ह्याच्या अधिकृत हँडलला टॅग केले आणि लिहिले, “या प्रकरणाकडे लक्ष द्या.”

हा व्हिडिओ १४मार्च रोजी X वर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला ३१५०० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा – धावत्या रेल्वेच्या छतावर चढून तरुणाने केला सबवे सर्फर-प्रेरित धोकादायक स्टंट! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले,” मुर्खपणा..

लोकांच्या प्रतिक्रिया
“या प्रकारच्या टोळ्या बेंगळुरूमध्ये सहसा आठवड्याच्या अखेरीस कार्यरत असतात. हाच वयोगट, हीच वाहने, हीच प्रक्रिया. सावध रहा आणि दूर रहा,” एका व्यक्तीने पोस्ट केले.

दुसऱ्याने जोडले, दुचाकी चालवताना ट्रिपल सिट बसणे, व्हिडिओ बनवण्यासाठी प्रत्येकाकडून २००० रुपये ट्रिपल दंड आकारा. स्टंट करणाऱ्या व्यक्तीकडून ५००० रुपये.

“हाच स्कूटर आणि सारखा दिसणारा माणूस त्याच चंदापुरा जंक्शनवर माझ्या कारला जवळजवळ धडकला. मी सावध ड्रायव्हर नसतो तर मी त्याला धडक दिली असती आणि दोष माझ्यावरच आला असता. ही गोष्ट महिनाभरापूर्वीची होती. ते थांबले नाही याचे वाईट वाटते. एसपी बेंगळुरू ग्रामीण जिल्हा कृपया कारवाई करा,” तिसऱ्याने व्यक्त केले.

चौथ्याने सांगितले, “बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेसवेवरही असेच घडते आणि ते अशाच प्रकारे इतर लोक त्यांच्या मार्गात येत आहेत.”