अनेकदा लोक विचित्र प्रयोग करतात किंवा काही ना काही स्टंटबाजी करताना दिसतात पण अनेकदा अशावेळी ते आपला जीवही धोक्यात घालताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये तरुणाला नको ती स्टंटबाजी चांगलीच महागात पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान मुले किंवा किशोरवयीन मुलांना नेहमी नव्या गोष्टींची उत्सुकता असते. एखादी नवीन गोष्ट हातात पडली की ती कशी काम करते हे जाणून घेण्याची उत्सुकता असते मग ती वस्तू तोडून, उघडून पाहतात. त्यामुळे त्या वस्तूचे नुकसान होते. पण काही वस्तू अशा असतात ज्यांवर असे प्रयोग करणे धोकादायक ठरू शकते. नेमके असेच काहीतरी या तरुणांने केले ज्यामुळे त्याचा जीवाला धोका निर्माण झाला होता.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, “एक तरुण हातात लायटर घेऊन उभा आहे. त्याच्या हातात दोन लायटर असतात. एक हातात लायटर पेटवतो आणि दुसरा लायटर दातांमध्ये पकडून तोडण्याचा प्रयत्न करतो. जसा लायटर तुटतो तसा आगीचा मोठा भडका उडतो आणि तरुणाच्या चेहऱ्याला आग लागते. तरुण घाबरून मागे जातो आणि लगेच आग शमते. त्यानंतर तरुण कॅमेऱ्याजवळ जाऊन स्वत:च्या चेहरा पाहतो. सुदैवाने तरुणाचा जीव वाचतो पण अशी स्टंटबाजी कोणी करू नये. अंगावर काटा आणणारा हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना घोस्ट राडटर चित्रपटाची आठवण झाली आहे. ज्यामध्ये प्रमुख पात्र असलेल्या घोस्ट रायडरचा चेहरा आगीने पेटलेला दाखवण्यात आले आहे.

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर अनेक कमेंटही केल्या आहेत.

“देवाने त्याला दुसरी संधी दिली” असे एकाने म्हटले

दुसऱ्याने कमेंट केली की, एका “सेकंदाचा घोस्ट रायडर”

तिसऱ्याने कमेंट केली, “म्हणून पुरुष लवकर मरतात”

अनेकांनी घोस्ट रायडरचे मिम्स देखील शेअर केले आहेत.