मुलगा काय करतो? लग्न ठरल्यानंतर विचारला जाणारा सर्वात पहिला प्रश्न. यामागचे कारणही साहजिक आहे, सर्वजण सुखी आयुष्याच्या शोधात आहेत आणि अनेकांची सुखाची परिभाषा पैशांशी जोडलेली आहे. याचा अनुभव सध्या भारतीय इंजिनीअर्सना येत आहे. अमेरिकेतील अनेक टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने काही भारतीय इंजीनीअर्सना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. आणि याचाच परिणाम त्यांच्या लग्नावर होत असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी हे मुलाचे लग्न जुळवण्यासाठी सर्वात आकर्षित करणारी गोष्ट मानली जाते. पण अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याने तामिळनाडूमधील काही आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे लग्नाचे मोठे संकट उभे राहिले आहे. काहींनी तर २०२४ पर्यंत लग्नाचा प्लॅन पुढे ढकलला आहे.
आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
न्यू जर्सी येथे राहणाऱ्या रामा राजू या तरुणाने याबद्दल सांगितले की, ‘या आधी लग्नासाठी आलेल्या इतक्या नकारांना कधीच सामोरे जावे लागले नाही. लग्नासाठी तयार नसताना अनेक स्थळं येत होती. पण आता जेव्हा लग्नासाठी तयार आहे तेव्हा नकार येत आहेत, कारणं त्यांना ‘हाय प्रोफाईल’ जॉब असणारा व्यक्ती हवा आहे. चांगल्या पगाराची नोकरी असुनही अनेकजणांकडुन नकार येत आहेत.’ ही समस्या तामिळनाडूमधील अनेक युवकांनी व्यक्त केली आहे.