सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते. कारण शेतात चिखलात काहीही लपून बसले असण्याची शक्यता असते. असंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका शेतात गवतामध्ये एक नव्हे तर तर १०, १२ साप लपून बसल्याचं आढळलं आहे. याचा खतरनाक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावाकडे शेतात अनेकांना साप चावल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेऊन शेतात काम केलं पाहिजे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात मधोमध गवतामध्ये हे साप लपून बसले आहेत. या सापांना बघूनच किळस येत आहे. अनेकदा प्राणी बाहेर पडतात, पाणी तुंबल्यानं त्यांना जमिनीतून किंवा बुरुजातून बाहेर यावे लागते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> निवृत्तीनंतर नवी इनिंग; ७० वर्षीय उबेर ड्रायव्हरनं फक्त ‘नकार’ देत कमावले २३ लाख रुपये
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @shetivadi या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. एकानं म्हंटलं आहे, “आमच्याकडे इतक्या तारा आहेत की तो त्यातचं अडकून जाईल.”