गणेशोत्सव हा देशातील लोकप्रिय उत्सवांपैकी एक सण आहे. गणपती हा हिंदु धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे. भारतमध्ये उत्साह आणि जल्लोषत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण झाले. पण तुम्हाला माहित आहे का की, भारताशिवाय अनेक देशांमध्येही गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो.

पाकिस्तानमध्ये साजरा केला जातो गणेशोत्सव

भारताशिवाय थायलंड, कंबोडिया, तिबेट, चीन, अफगाणिस्तान, जपान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये गणपती बाप्पाची पुजा केली जाते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानमध्येही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक मराठी कुटुंब पाकिस्तानमध्ये गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

मराठी कुटुंबाने गायली बाप्पाची आरती

व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक लोक एकत्रितपणे गणपत्ती बाप्पााच्या आरती करत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतात दिसत आहे. उत्साहात आणि जल्लोषात लाडक्या बाप्पाचा जयघोष करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर theamarparkash नावाच्या पाकिस्तानमधील डिजीटल क्रिएटरने हा पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,
“पाकिस्तानामधील कराची येथे मराठी बांधव गणेश चतुर्थीनिमित्त आरती म्हणत आहेत.”

हेही वाचा – “ना कुठलं मंडळ, ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, जिथे बंदोबस्त तिथेच सुखकर्ता दुःखहर्ता!”, महाराष्ट्र पोलिसांचा Video Viral

हेही वाचा – बाईsss .. हा काय प्रकार! पुराच्या पाण्यात अडकलेलं जोडपं कारच्या छतावर बसलं होतं गप्पा मारत; काका काकूंचा Video Viral

नेटकरी झाले चकित

व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता. अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले तेव्हा उत्तर देताना काही सांगितले की, होय, कराचीमधील मराठी आणि तमिळ लोक हे लोक बंदर शहरांमध्ये व्यवसायासाठी प्रवास करतात.

दरम्यान एकाने कमेंट कर म्हटले की,”व्वा… भारताबाहेर मराठी भाषा बोलली जात आहे हे पाहून आनंद झाला. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा”

हेही वाचा –Video : पुणेकरांनो, आता घरबसल्या मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन! एका क्लिकवर पाहा प्रसिद्ध गणपती मंडळाचे देखावे

पाकिस्तानमधील कराचीमध्ये गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भक्ताचे आणखी व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. याबाबत AIR मुंबईने ट्विट करत माहिती दिली की, कमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे.
महाराष्ट्र सत्संग परिवार, मराठी हिंदू सेवा संघ कराची मधील रत्नेश महादेव मंदिरात गणेशाचं आगमन.”

Story img Loader