एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं, परिणामी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. गेल्या आठ वर्षात मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे.होय, हे खरंय. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. कारण याच मराठी माणसाच्या मुंबईत मराठी माणसाला जगण्यासाठी संघर्षही करु दिला जात नाहीये. परप्रांतीयांकडून किंवा इतर लोकांकडून मराठी माणसांना त्रास दिल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात.

परप्रांतीयांची दादागीरी

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर बेदाणे विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला स्थानिक प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शेतमाल विकण्यास केली मनाई

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील प्रशांत पाटील हा तरूण सीएसएमटी येथे बेदाणे विक्री करत होता. यावेळी त्याला स्थानिक प्रशासनाकडून विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्रास देण्यात आला. “इतर लोक बिनधास्त विकत आहेत त्यांना मात्र कोण काही करत नाही पण या मराठी तरुणाला त्रास दिला जातो, मुंबईत मराठी माणसालाच धंदा करू देत नाहीत.” असा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दैव बलवत्तर! मृत्यूपासून थोडक्यात बचवला हा युवक; अवघ्या ५ सेंकदात पूल कोसळला, घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबई आणि मराठी भाषा, मुंबई आणि मराठी माणूस या सर्वांवरचं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पारंपरिक मतदार असलेला मराठी माणूसच मुंबई आणि उपनगरातून हद्दपार होतं असल्याचं उघड झालं आहे. हा व्हिडीओ पाहून “मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही”, अशा प्रकारच्या प्रितिक्रिया देत नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader